शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उधारीच्या पैशावरून मित्रावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:44 IST

उधारीच्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणावर मित्राने साथीदाराच्या मदतीने हल्ला करून जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उधारीच्या पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणावर मित्राने साथीदाराच्या मदतीने हल्ला करून जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी निखिलेश जगन कुंभारे (३०), रा. सिहोर, ता. तुमसर, भंडारा याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये नकुल राजू मेरखेडे (२५) लालगंज, सुरेंद्र्र माणिकराव डोळे (२७) रा. गंजीपेठ, गणेशपेठ, प्रताप मोहन गौर (२३) रा. बजेरिया व त्यांचे इतर साथीदार यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निखिलेश आणि नकुल हे दोघे मित्र आहेत. नकुलने निखिलेशला ३० हजार रुपये उधार दिले होते. मात्र खूप दिवस होऊनही निखिल पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत होता. नकुलने त्याला पैसे परत करण्यावरून अनेकदा बजावले होते. मात्र निखिलेश त्याला पैसे परत करत नव्हता. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता निखिलेश हा मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर असल्याची माहिती नकुलला मिळाली. या माहितीवरून नकुल, सुरेंद्र, प्रताप आणि अन्य तीन जण बसस्थानकावर गेले. त्यांनी निखिलेशला गाठून पैशाची मागणी केली. निखिलेशने नेहमीप्रमाणे पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे संतापलेल्या नकुलने मित्रांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. शिवीगाळ करून हातबुक्कीने जबर मारहाण करण्यात आली. पैसे परत न केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर