शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात माजी नगरसेवकाचा शेजाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 21:26 IST

घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देदोन युवक जखमी : सक्करदरामधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरासमोर बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादामध्ये माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यावर हल्ला केला. या घटनेमध्ये शेजारी राहणारा युवक आणि त्याचा चुलत भाऊ जखमी झाले. सक्करदरामधील गवंडीपुरा येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक अनिल वाघमारे आणि त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल वाघमारे (५१) हे गवंडीपुरा येथे राहतात. त्यांच्या शेजारीच अंकुश खाडे (२६) हा राहतो. बुधवारी रात्री अंकुशच्या घरी आत्या आणि त्यांचा मुलगा आकाश हे जेवणासाठी आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने अंकुशच्या घरासमोरच आपली बाईक पार्क केली होती. त्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्यांना अडचण होत होती. हे पाहून अनिल वाघमारे यांना राग आला. त्यांनी शिवीगाळ करून वाद घातला. अंकुशने वाघमारे यांना समजावून शिव्या न देण्यास सांगितले. त्यामुळे तो अधिकच चिडला. त्याने आपली पत्नी आरती, मुलगा शुभम वाघमारे, बॉबी वाघमारे तसेच मुलीच्या मदतीने हल्ला केला. यात अंकुश आणि आकाश जखमी झाले.या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर आरोपी गायब झाले. सक्करदरा पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. हल्ला करणे, धमकावणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे अंकुश खाडे यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींनी कारण नसताना वाद घालून मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर