नागपुरात बंद एस्केलेटरमुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:08 IST2018-02-23T00:04:51+5:302018-02-23T00:08:50+5:30

In Nagpur escalator delivers to the train passengers | नागपुरात बंद एस्केलेटरमुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

नागपुरात बंद एस्केलेटरमुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

ठळक मुद्देसंत्र मार्केटकडील घटना : ज्येष्ठ प्रवाशांची झाली गैरसोय


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेले एस्केलेटर (स्वयंचलित जीना) गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे या भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
गुरुवारी सकाळपासून पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील एस्केलेटर बंद होते. बंद एस्केलेटर सुरू करण्यासाठी रेल्वेचा एकही कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मध्यंतरी दोन वेळा हे एस्केलेटर सुरू होऊन पुन्हा बंद झाले. यामुळे संत्रा मार्केट भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या  प्रवाशांना त्रास झाला. यात सामान घेऊन रेल्वेस्थानकात जाणाऱ्या  ज्येष्ठ प्रवाशांना आणखीनच मनस्ताप होऊन त्यांना पायऱ्या  चढून ओव्हरब्रीजवर जाण्याची पाळी आली. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने एकही कर्मचारी बंद पडलेले एस्केलेटरची दुरुस्ती करण्यासाठी तैनात न केल्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनातर्फे प्लॅटफार्मवरही एस्केलेटर लावण्याची तयारी सुरूआहे. परंतु एस्केलेटर लावून मोकळे व्हायचे आणि ते बंद पडल्यानंतर सुरू करण्यासाठी एकही कर्मचारी तैनात करायचा नाही या भूमिकेमुळे प्रवाशांना मनस्तापच होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस्केलेटर बंद पडू नये आणि बंद पडलेले एस्केलेटर त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: In Nagpur escalator delivers to the train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.