शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  वीज कर्मचाऱ्याकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:26 IST

वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला.

ठळक मुद्देमीटर रिडिंगचे निमित्त : पिण्याचे पाणी मागून शिरला घरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोतवालीमध्ये ही घटना घडली.प्रशांत श्रावण गायकवाड (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील अंबिकानगरात राहतो. वीज मंडळात तो कंत्राटी कामगार आहे. त्याच्याकडे मीटरचे रिडिंग घेण्याची जबाबदारी आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी प्रशांत कोतवालीतील मीटर रिडिंग घेत होता. पीडित युवतीच्या घरातील मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. ती घरात पाणी आणायला गेली. घरात तिच्याशिवाय दुसरे कुणी नसल्याचा अंदाज आल्यामुळे आरोपीची मती फिरली. त्याने घरात मागून जाऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपी प्रशांतला पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर कोतवाली पोलिसांना बोलवून घेतले. पोलिसांनी आरोपी प्रशांत गायकवाडविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.यापूर्वीही घडल्या घटनामीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या आरोपींनी महिला-मुलींचा विनयभंग करण्याच्या घटना यापूर्वीही शहरात घडल्या आहेत. बदनामीच्या धाकाने अनेक प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही. काही ठिकाणी मात्र अशा भामट्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर