शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नागपुरात डॉक्टरांनी पकडले दारुड्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:12 PM

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : मैदानात सुरू होती दारू पार्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले. विशेष म्हणजे, या मैदानासमोर मुलांचे वसतिगृह आहे. सायंकाळी या मैदानावर नेहमीच असामाजिक तत्त्वांचा वावर राहत असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मेडिकलच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललगत असलेल्या क्रिकेट मैदानाचा विकास करण्यात आला आहे. परंतु येथे दिवसासोबतच रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या वसाहतींतील मुले खेळत असतात तर काही व्यायाम करीत असतात. सायंकाळी या मैदानात असामाजिक तत्त्वे सक्रिय होतात. सर्रास दारू पिणे, अमली पदार्थांचे व्यसन करण्याचा प्रकार सुरू असतो. रविवारी सायंकाळी दुर्गानगर येथील काही युवक कारच्यावर दारूच्या बाटल्या ठेवून पार्टी करीत होते. मेडिकलचे डॉ. अर्पित धकाते व डॉ. संकेत वाढवकर तेथून जात असताना त्यांनी यावर आक्षेप घेतला व अजनी पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच पोलीस पोहचून त्यांनी दारुड्यांना ताब्यात घेतले. मेडिकलच्या या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टरliquor banदारूबंदी