शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:45 IST

नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे.

ठळक मुद्दे भाजपचे वर्चस्व कायमकाटोल- नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचा गजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवित कॉँग्रेस पक्षाने घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काही तालुक्यातील प्रमुख ग्रा.पं.मध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रा.पं.वर विजय मिळविला आहे.जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला १३ तालुक्यात सकाळी सुरुवात झाली.यात प्राथमिक कलानुसार जिल्ह्यात काँग्रेस समर्थीत पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रा.प.च्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्म गाव असलेल्या धापेवाडा येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंच पदी निवडुन आले.धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा केवळ १ उमेदवार निवडून आला. यासोबतच खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे विजय झाल्या.नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात सहा ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले.त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले होते. या ग्रा.प.च्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. दुपारपर्यंत आलेल्या निकालात काँग्रेस जिल्ह्यात नंबर १ चा पक्ष ठरण्याची स्थिती आहे.जिल्ह्यात उमरेड तालुक्यात हळदगाव ग्रा.पं. (काँग्रेस), परसोडी (भाजप), उटी (काँग्रेस), मांगली (भाजपा), सुरगाव (कॉँग्रेस-बसपा) बाजी मारली आहे. उमरेड तालुक्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेस-भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी प्रत्येकी ८ गावावर विजय मिळविला आहे तर गावामध्ये अपक्ष आणि एक गावात बसपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.जिल्ह्यात काटोल तालुक्यातील कोंढाळी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी कॉँग्रेस समर्थित केशव धुर्वे यांचा विजयी झाले. नागपूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी ग्रा.पं. आहे, हे विशेष. खानगाव येथेही राष्ट्रवादी समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी खाते उघडले.सावनेर तालुक्यात २७ ही ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.मौैदा तालुक्यात पावडदौना ग्रा.पं.वर भाजप समर्थित सतीश भोयर विजयी झाले. येथे नानादेवी ग्रा.प.च्या सरपंचपदी हरीदास श्रावण मारबते (सेना समर्थित), बोरगाव ग्रा.प.वर काँग्रेस समर्थित पॅनेलच्या स्वाती सुर्यकांत ढोबळे, दहेगाव ग्रा.पं.वर भाजप समर्थित पॅनेलचे बाळा आंबीलडुके सरपंचपदी विजयी झाले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदार संघ असलेल्या कामठी तालुक्यात ११ ग्रा.पं.पैकी ७ ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित तर ४ ग्रा.पं.वर भाजप समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक