शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 23:41 IST

Accident, death भरधाव ट्रकने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक देत दुचाकीवरील दाेघांना चिरडले. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकीला दिली मागून धडक : खुरजगाव शिवारातील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्कसावनेर/केळवद : भरधाव ट्रकने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक देत दुचाकीवरील दाेघांना चिरडले. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दाेघेही शेती करायचे. ही घटना केळवद (सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-केळवद मार्गावरील खुरजगाव शिवारातील एका धाब्यासमाेर साेमवारी (दि. ५) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

वामन गोविंदराव आगरकर (हावरे) (४८) व नंदकिशाेर अशुराज जाेगी (२७) दाेघेही रा. हत्तीसर्रा, ता. सावनेर अशी मृतांची नावे आहेत. वामन आणि नंदकिशाेर माेटरसायकलने (क्र. एमएच-३२ एफ-२५८२) सावनेरहून केळवदच्या दिशेने हत्तीसर्रा येथे जात हाेते. ते खुरजगाव फाटा परिसरातील धाब्याजवळ पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या ट्रकने (एमपी-०९/जीएच-०३६०) त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. दाेन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. दाेघांकडेही थाेडीफार शेती असून, ते शेतीवर उदरनिर्वाह करायचे. ते खरेदी करण्यासाठी सावनेर शहरात आले हाेते. अपघात हाेताच चालकाने ट्रक साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी ट्रक जप्त केला असून, क्लिनर इद्रिस अहमद इरफान अहमद (रा.बिटाडिया, इंदाेर, मध्य प्रदेश) यास अटक केली असून, ट्रकचालक गुफरान खान (रा.राजापूर, मध्य प्रदेश) यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू