शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जूनमध्ये नागपूर जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस; शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:14 IST

जून महिन्यात अनेक वर्षानंतर विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात यंदा पावसाची सरासरी ओलांडणार!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा मान्सूनचा पाऊस लवकर आणि चांगला बरसल्याने जून महिन्यात ११३.३ टक्के पावसाची नोंद झाली. जून महिन्यात अनेक वर्षानंतर विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे बोलले जात आहे.१ ते ३० जून दरम्यान सरासरी १६६.३ मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या तुलनेत महिनाभरात १८८.४ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच सरासरीच्या ११३.३ टक्के पाऊस जून महिन्यात झाला. गेल्यावर्षी जूनमध्ये केवळ ८२.७ मिमी म्हणजे ४९.७ टक्के इतकाच पाऊस झाला होता. गेल्यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस आणि यंदाही जिल्ह्यात मान्सून लवकर सक्रिय झाल्याने भूजल पातळी वाढली आहे. यावर्षी जूनमध्ये जिल्ह्यात २१ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे धरण, तलाव, बंधारे, शेततळे, विहिरी, बोअरवेल रिचार्ज करून भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात नागपूर जिल्ह्यात साधारणत: १००० मिमी सरासरी पाऊस अपेक्षित असतो. जूनमध्येच १८८.४ मिमी प्रत्यक्ष पाऊस पडला आहे. तर जुलैच्या आजच्या तारखेपर्यंत २०७ मिमी इतका पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये ४९.७ मिमी इतकाच पाऊस पडला होता.

- धरणांच्या जलसाठ्यातही वाढनागपूर शहर व ग्रामीण भागासाठी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प तोतलाडोह आहे. तोतलाडोहची साठवण क्षमता १०१६.८८ दशलक्ष घन मीटर आहे. पण आजच्या स्थितीत तोतलाडोह येथे ७८७.८१ दलघमी म्हणजेच ७७.४६ टक्के पाणीसाठा आहे. आठवडाभरात धरणात १७.९६ दलघमी पाणीसाठा वाढलेला आहे. तर जिल्ह्यातील इतरही धरणांतील पाणीसाठा चांगलाच वाढत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस