शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा ग्रा.पं.निवडणूक निकाल : भाजपाचे वर्चस्व, काँग्रेसची घरवापसी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:27 IST

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामाच्या बळावर भाजपाने वर्चस्व कायम राखत नंबर १ पटकावला आहे. जिल्ह्यात भाजपा समर्थित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी १२४ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. इकडे महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आत्महत्या यावर सत्ताधारी भाजपाची कोंडी करणाऱ्या काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी जिल्ह्यात १०० अधिक ग्रा.पं.वर ताबा मिळवित घरवापसी केली आहे.

ठळक मुद्देकाटोल-नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचा गजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामाच्या बळावर भाजपाने वर्चस्व कायम राखत नंबर १ पटकावला आहे. जिल्ह्यात भाजपा समर्थित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी १२४ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. इकडे महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आत्महत्या यावर सत्ताधारी भाजपाची कोंडी करणाऱ्या काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी जिल्ह्यात १०० अधिक ग्रा.पं.वर ताबा मिळवित घरवापसी केली आहे.जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने दमदार यश मिळविले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने ७६ हून अधिक ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. जिल्ह्यात रामटेक, पारशिवनी, मौदा, कुही आणि भिवापूर तालुक्यात शिवसेना समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी यश मिळविले आहे. सेनेला जिल्ह्यात २८ जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.मध्ये अपक्षांनी काँग्रेस आणि भाजपाला मागे टाकीत ३९ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. जिल्ह्यात बसपाने सावनेर, कुही आणि उमरेड तालुक्यात खाते उघडले. रामटेक तालुक्यात प्रहार समर्थित पॅनेलचा एक तर गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी दोन ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे.नागपूर जिल्ह्यातील ३७९ ग्रा.पं.च्या सरपंच आणि सदस्य पदासाठी बुधवारी ८०.२० टक्के मतदान झाले. गुरुवारी ३७९ ग्रा.पं.चे निकाल जाहीर झाले. यावेळी सरपंच पदाची थेट जनतेतून निवड करण्यात आली. यात जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच भाजप समर्थित पॅनेलचे निवडून आले.नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंचपदी निवडून आले. धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे १६ तर भाजपा समर्थित पॅनेलचा केवळ एक उमेदवार निवडून आला. यासोबतच खासदार दत्तक ग्राम योजनेंतर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे विजयी झाल्या.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठी तालुक्यात ११ ग्रा.पं.पैकी ७ ग्रा.पं.वर काँग्रेस समर्थित तर ४ ग्रा.पं.वर भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी दमदार यश मिळविले.एकूण ग्रा.प. - ३७९भाजप समर्थित - १२४काँग्रेस समर्थित - १००राष्ट्रवादी समर्थित - ७६सेना समर्थित - २८बसपा समर्थित - ०३अपक्ष - ३९इतर पक्ष समर्थित - ०९भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टांचे फळ ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मिळाले आहे. ३७३ पैकी २१८ हून जास्त जागांवर भाजपप्रणित उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांना मतदारांनी दिलेली ही पावती आहे. ‘डीपीसी’चा निधी आम्ही २२० कोटींहून ६५१ कोटींवर नेला. या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे वाढली. शिवाय शासकीय योजनांचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला मिळावा यासाठी सर्व तऱ्हेने प्रयत्न करण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांवर मतदारांनी विश्वास दाखविला. काही ठिकाणी आमचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले व ३२ जागांवर याचा फटका बसला. मात्र ग्रामीण भागातील राजकारणाचा हा प्रकार होता. पक्षात कुठलीही गटबाजी नाही व मोठ्या पातळीवरील निवडणुकात सर्व कार्यकर्ते सोबतच काम करतील.चंद्रशेखर बावनकुळेपालकमंत्री, नागपूर जिल्हानागपूर जिल्ह्यातील मतदारांनी सत्ताधारी भाजप-सेनेला नकारात काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थिन पॅनेलच्या उमेदवारांना विजयी केले, यासाठी जिल्ह्यातील मतदारांचा आभारी आहे. जिल्ह्यात काँग्रेस समर्थित गटांचे १३३ तर राष्ट्रवादी समर्थित गटाचे ९६ सरपंच निवडून आले. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी २२९ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. नितीन गडकरींच्या धापेवाड्यात काँग्रेसचा सरपंच निवडून आला. त्यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावात भाजप समर्थित पॅनेलचा सरपंच हरला. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावातही भाजप समर्थित उमेदवाराला जनतेने नाकारले होते. वाढती महागाईने त्रस्त असलेल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे.राजेंद्र मुळकअध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसनागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने ही निवडणूक सोबत लढविली. त्यात आम्हाला समाधानकारक यश आले. एवढेच काय तर सर्व मोठ्या ग्रामपंचायतीवरही आम्ही ताबा मिळविला. ही आमच्या कामाची पावती आहे. पक्षसंघटनामुळेच आम्हाला हा विजय मिळू शकला. या निवडणुकीत पैशाचा महापूर आला असताना मतदारांनी दिलेला कौल हा सत्ताधाऱ्यांना धडा शिकविणारा आहे. हिंगणा, काटोल तालुक्यात विजयी घोडदौड कायम राहिली. हिंगण्यात ४१ पैकी २१ तर नागपूर तालुक्यातही ८ पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर आम्ही वर्चस्व निर्माण केले. हा जनतेचा विजय आहे. रमेश बंग,जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसआज जाहीर झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे ९७ सरपंच निवडून आलेले आहे. सरपंचांची निवड थेट जनतेमधून होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच निवडून आल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली. शिवसेना पुरस्कृत सरपंच निवडून आल्यामुळे ग्राम पंचायातींवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार असून विकासाला नवी दिशा या माध्यमातून मिळणार आहे. शिवसेनेच्या या यशामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कृपाल तुमानेशिवसेना नेते तथा खासदार, रामटेक

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक