दिलासादायक! नागपूर जिल्ह्यात ५१,५५६ पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 22:24 IST2020-09-20T22:24:03+5:302020-09-20T22:24:24+5:30
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे.

दिलासादायक! नागपूर जिल्ह्यात ५१,५५६ पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान एक आनंदाची बातमीही आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३६२ व ग्रामीणमधील २४८ आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसात संसर्ग वाढल्याने रिकव्हरी रेट ४१ टक्केवर आली होती. परंतु सध्या संसर्ग वाढत असतानाही बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी नागपूर शहरातील ४२,२९८ आणि ग्रामीणमधील ९२५८ आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६३,७५७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या २०४४ झाली आहे. १०,१५७ अॅक्टीव्ह केसेस आहेत. यात शहरातील ५५७० तर ग्रामीणमधील ४५८७ आहेत. एकूण अॅक्टीव्ह रुग्णांपैकी ५०८३ होम आयसोलेशनमध्ये आहेत.
३१ जुलैपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५३९२ झाली होती. तर १२६ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण ३४७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. अॅक्टीव्ह केसेस १७८९ होते. त्यामुळे जुलैच्या शेवटी रिकव्हरी रेट ६४.४८ इतके होते. तेच ऑगस्टच्या शेवटी नागपूर जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९,५५५ झाली होती. तर १०४५ जणांचा मृत्यू झाला होता. ३१ ऑगस्टपर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले हाोते. अॅक्टीव्ह केसेस ९२६६ होते. अशा परिस्थितीत ऑगस्टच्या शेवटी रिकव्हरी रेट ६५.११ टक्केवर पोहोचला. परंतु सप्टेंबरमध्ये ज्या गतीने रुग्ण आढळून आले, त्याच गतीने बरे होण्याचे प्रमाणही वाढले.