नागपूर विभाग ३१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:40 IST2017-09-12T00:39:35+5:302017-09-12T00:40:05+5:30

केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य देत आहे

Nagpur Department will free up the counting by March 31 | नागपूर विभाग ३१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करा

नागपूर विभाग ३१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करा

ठळक मुद्देश्यामलाल गोयल : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाºया योजना पूर्ण करून विभागातील गावे ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदरीमुक्त करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार उपस्थित होते.
नागपूर विभागात स्वच्छ ग्रामीण भारत मिशनअंतर्गत भौतिक व आर्थिक प्रगती व उर्वरित कामाचे नियोजन, छायाचित्र अपलोडिंग सद्यस्थिती, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत व पडताळणी, स्वच्छता दर्पण पुरस्कार, स्वच्छता स्पर्धा सहभाग, नादुरुस्त शौचालय प्रगती व निधी खर्चाचा आढावा, माहिती, शिक्षण व संवाद अंतर्गत विविध उपक्रम व झालेला खर्च आणि सन २०१६-१७ चे उपयोगिता प्रमाणपत्र व लेखा अहवाल व सन २०१७-१८ चे प्रमाणपत्र आदी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
यावेळी सर्व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, वासोचे संचालक सतीश शहा, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे अपर संचालक डॉ. आय.आय. शाह, मुख्य अभियंता गजभिये, उपायुक्त जाधव, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता व्ही. बी. जगतारे, अधीक्षक अभियंता व्ही. के. शिंगरु, आदी उपस्थित होते.
प्रदूषण रोखण्यासाठी ठोस कृती करा
मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याविषयी श्यामलाल गोयल यांनी निर्देश दिले. गावात कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत ठोस कृती करा. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे हाती घेण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अनुप कुमार यांनी दिली खात्री
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी नागपूर विभाग हा ३१ मार्च २०१८ पूर्वीच हागणदारीमुक्त करण्याबाबत अपर मुख्य सचिवांना ग्वाही दिली. तसेच नागपूर विभागात पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान प्रभावीपणे गाव पातळीवर राबविण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद हे उपक्रम राबवून ग्रामपंचायती खºया अर्थाने हागणदरीमुक्त करण्याचे आवाहन उपस्थित सर्व जिल्हास्तरीय अधिकाºयांना केले.

Web Title: Nagpur Department will free up the counting by March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.