शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मोबाईल लंपास करणाऱ्याचा धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग, आरपीएफची प्रशंसनीय तत्परता

By नरेश डोंगरे | Updated: January 16, 2025 19:45 IST

Nagpur Crime News: वेटिंग हॉलमध्ये सोफ्यावर पडून असलेला मोबाईल खिशात घालून जळगावकडे पळून जाणाऱ्या व्यक्तीचा आरपीएफच्या जवानाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग केला आणि त्याला अजनी रेल्वे स्थानकावर पकडले.

नागपूर  - वेटिंग हॉलमध्ये सोफ्यावर पडून असलेला मोबाईल खिशात घालून जळगावकडे पळून जाणाऱ्या व्यक्तीचा आरपीएफच्या जवानाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग केला आणि त्याला अजनी रेल्वे स्थानकावर पकडले. त्याच्याकडून तो मोबाईलही ताब्यात घेण्यात आला. तक्रार मिळाल्यानंतर प्रशंसनीय तत्परता दाखवत आरपीएफने ही कामगिरी बजावली.

ग्वाल देवीया, मध्य प्रदेश येथील पूजा आणि साैरभकुमार जैन हे दाम्पत्य गाडीला वेळ असल्याने बुधवारी वेटिंग हॉलमध्ये बसले होते. बाहेर पडताना पूजा यांचा मोबाईल सोफ्यावर राहून गेला. ती संधी साधून जळगावच्या जितेंद्र कापसेने तो मोबाईल खिशात घालून नागपूर-पुणे ट्रेन पकडली. दरम्यान, जैन दाम्पत्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडे (आरपीएफ) मोबाईल चोरीची माहिती देताच त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा हा मोबाईल उचलून एक व्यक्ती नागपूर-पुणे ट्रेन मध्ये बसल्याचे दिसून आले. त्यावेळी गाडी नुकतीच रेल्वे स्थानकावरून सुटली होती. ते पाहता अंमलदार कुंदन फुटाने यांनी लगेच त्या गाडीकडे धाव घेतली. गाडीत बसून त्या प्रवाशाची शोधाशोध केली. अजनी रेल्वे स्थानकावर गाडी पोहचल्यानंतर कुंदनने कापसेला ताब्यात घेतले. त्यानंतर कापसेसह कुंदन पुन्हा रेल्वे स्थानकावर पोहचला. कापसेच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला मोबाईल आपलाच असल्याचे जैन दाम्पत्याने सांगितले. त्यानंतर कायदेशिर प्रक्रिया पार पाडून हा मोबाईल त्यांना सोपविण्यात आला.

चोरीला गेलेला मोबाईलचोरीला गेलेला मोबाईल एवढ्या तातडीने शोधून काढण्याच्या या कामगिरीसाठी कुंदन फुटाणे यांना उपनिरीक्षक विजयपाल सिंग, हवलदार वीना सोरेन आणि अंमलदार नीरज कुमार यांनी मदत केली. दरम्यान, आपला मोबाईल तातडीने परत मिळाल्याचे पाहून जैन दाम्पत्याने नागपूर आरपीएफचे आभार मानत आपल्या गावाचा मार्ग धरला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे