नागपुरात विवाहितेची आत्महत्या, नव-यासहीत सासरच्यांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: March 30, 2017 13:31 IST2017-03-30T13:31:18+5:302017-03-30T13:31:18+5:30
नवरा आणि सासू-सास-याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नागपुरात विवाहितेची आत्महत्या, नव-यासहीत सासरच्यांविरोधात गुन्हा
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - नवरा आणि सासू-सास-याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वृषाली आशुतोष हावरे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
वृषालीच्या आत्महत्येसाठी तिचा नवरा, सासू-सासरे कारणीभूत असल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसात दिली. यानंतर अंबाझरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगरातील सौजन्य अपार्टमेंटमध्ये राहणा-या वृषालीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वृषालीचे माहेर दर्यापूर (जि.अमरावती) येथे आहे. मुलीनं आयुष्य संपवल्याची माहिती मिळल्यानंतर सासरी दाखल होत वृषालीच्या आईनं अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.
वृषालीला तिचा नवरा आणि सासू सासरे तीन वर्षांपासून छळत होते. हा छळ असह्य झाल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे साबळे यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी आशुतोष रमेश हावरे (वय ३८) त्याचे वडील रमेश हावरे (वय ६०) आणि आई उषा हावरे (वय ५८) यांच्याविरुद्ध कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला.