शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

नागपुरात आजही छतांवर सुरू आहे मृत्यूचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:43 IST

शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या  या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे.

ठळक मुद्देकमला मिल अग्निकांड प्रकरणानंतरही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या  या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे. मुंबईतील कमला मिल अग्निकांडाच्या घटनेनंतर मुंबईच्या मनपा आयुक्तांनी इमारतींच्या छतांवर अवैध पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेल व बार विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर राज्यातील सर्व महानगरपालिकांनाही जाग आली होती. त्यांनी अवैध हॉटेल आणि बार विरुद्ध कारवाई करण्याचा संकल्प केला होता. याअंतर्गत शहरातील इतर शासकीय विभागसुद्धा सक्रिय होतील, अशी शक्यता होती. परंतु कमला मिल अग्निकांड आणि आता रुफ नाईन बार व हुक्का पार्लरवर झालेल्या कारवाईनंतरही कुठलीही हालचाल सुरू झाली नाही. परिणामी इमारतींच्या छतांवर अवैध बार, हॉटेल आणि हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहे.शहरात सदर, रामदासपेठ, धरमपेठ, अंबाझरी, बजाजनगर, गांधीसागर तलाव परिसर, कामठी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, अमरावती महामार्ग, एमआयडीसी आणि हिंगणा परिसरात जवळपास १०० ठिकाणी छतांवर अवैध बार, हॉटेल आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. या ठिकाणी आग लागण्याचा सर्वाधिक धोका आहे. इमारतीच्या छतावर स्वयंपाकघर आणि ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येते. ताडपत्री किंवा प्लास्टिकचे छत तयार करून हॉटेलचे रूप देण्यात आले आहे. किचन आणि ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने तिथे कमला मिलच्या धर्तीवर आग लागण्याचा धोका नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर सर्वप्रथम अग्निशमन विभागामार्फतच अशा हॉटेल व बारविरुद्ध कारवाई व्हायला हवी. परंतु या दिशेने अजूनपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षाअधिनियमांतर्गत अवैध हॉटेल किंवा बार तातडीने ‘सील’सुद्धा करता येऊ शकतात. शहरात असे अनेक हॉटेल आणि बार आहेत ज्यांनी अवैधपणे इमारतींच्या छतावर कब्जा करून ‘टेरेस रेस्ट्रो’ उघडले आहेत. छतावरच भोजन आणि दारू उपलब्ध केली जाते. छतावर किचनसुद्धा बनविण्यात आले आहे. असे हॉटेल आणि बारची संख्या खूप आहे. संबंधित हॉटेल व बारकडे अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा असते. यात किचन आणि सुरक्षेच्या मानकाचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेले असतात.छतावर रेस्टॉरंट चालवण्यात येत असल्याने एनओसीच्या नियमांचेही उल्लंघन होते. परंतु अजूनपर्यंत कुठल्याही हॉटेल किंवा बारच्या विरुद्ध अशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अग्निशमन विभागाच्या पाहणीत मात्र अनेक हॉटेल व बार छतांवर सुरू असल्याचे आढळून आले आहे. सीताबर्डी, सदर, बजाजनगर, अंबाझरी, वाडी, एमआयडीसी, हिंगणा पोलीस ठाणे परिसरात टेरेस रेस्ट्रो अ‍ॅण्ड बारची संख्या अधिक आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे हॉटेल किंवा बार चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मनपा, पोलीस आणि अबकारी विभागाकडे अनेक नियम व तरतुदी आहेत. अशा हॉटेल व बारचे वीज व पाणीसुद्धा बंद केले जाऊ शकते. पोलीस स्वयं मनपा प्रशासनाला ते बंद करण्याची विनंती करू शकतात. परंतु ‘मासिक कमाई’मुळे कुणीही याला गांभीर्याने घेत नाही.सूत्रानुसार अग्निशमन विभागाच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करून हॉटेल किंवा बार चालवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु अग्निशमन विभागाने स्वत: कारवाई करण्याऐवजी संबंधित मनपा झोन कार्यालयाला कारवाई करण्याची शिफारस केली आहे. संबंधित मनपा झोनचे अधिकारीसुद्धा काही कारणास्तव या शिफारशीवर कारवाई करताना दिसून येत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, ‘एनओसीची कमाई’ अग्निशमनच्या खिशात जाते. तेव्हा त्यांनीच यासंबंधात कारवाई करायला हवी.बँक्वेट हॉलला आश्रयगांधीसागर तलावाजवळ असलेल्या चर्चित बँक्वेट हॉलच्या छतावर किचन सुरू आहे. सूत्रानुसार कुठल्याही क्षणी येथे अपघात होऊ शकतो. यादृष्टीने अग्निशमन विभागाने बँक्वेंट हॉलच्या संचालकाला नोटीस जारी केली आहे. यानंतरही येथे किचन सुरू आहे. या बँक्वेट हॉलमध्ये नेहमीच नेते आणि प्रभावशाली लोकांचे विवाह समारंभ आयोजित केले जातात. त्यामुळे कुणीही कारवाई करण्याची हिंमत करीत नाही आहे. बँक्वेट हॉल रहिवासी परिसरात आहे. अशापरिस्थितीत एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण राहील? या विचाराने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटतो. गांधीसागर रोडवरील एक सावजी हॉटेलसुद्धा ‘मेहेरबानी’च्या मोबदल्यात मोठी रक्कम मोजतो, असे सांगितले जाते.

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवnagpurनागपूर