शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

प्रकल्प काठोकाठ असूनही नागपूर शहराला पाणी कमी मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:44 AM

तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

ठळक मुद्देमनपाची मागणी १८२ दलघमीची मिळाले १७२ दलघमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्प काठोकाठ भरले आहे. त्यानंतरही नागपूर शहराला १० दलघमी पाणी कमी मिळणार आहे. पाण्याचे महत्त्व कळावे व पाण्याची नासाडी कमी व्हावी, या हेतूने महाराष्ट्र जल संसाधन नियोजन प्राधिकरणाने नागपूर शहरासाठी १७२ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. वास्तविक महापालिकेने १८२ दलघमी पाण्याची मागणी केली होती. जलसंपदा विभागाने पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. पाणी आरक्षणाची व्यवस्था तात्काळ लागू करण्यात आली आहे. आरक्षण ३१ ऑक्टोबर २०२० पर्र्यत लागू राहणार आहे.महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार तोतलाडोह प्रकल्पातून नागपूर शहराला १५२ दलघमी तर कन्हान नदीतून २० दलघमी पाणी मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जल संसाधन नियोजन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचा आराखडा निश्चित केला. पाण्याची बचत करावयाची आहे. फक्त १२ महिन्यांचा विचार करून चालणार नाही. भविष्याचा विचार करता पाणी बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज लक्षात घेऊन आरक्षण निश्चित केल्याचे रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.गेल्या वर्षी महापालिकेने १९३ दलघमी पाण्याची मागणी केली होती. यातील १५५ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढली होती. तोतलाडोतील मृत साठ्यातील पाणी उचलण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. महापालिकेने १७०दलघमी पाणी उचलले होते. नागपूर शहराला दररोज ६४० ते ६६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.तोतलाडोहात ९९.२२ टक्के साठाशहरासाठी मर्यादित पाणी आरक्षण ठेवले आहे. परंतु तोतलाडोह प्रकल्पात सध्या ९९.२२ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी प्रकल्पात ७६.२४ टक्के जलसाठा आहे. तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता ११६६.९३ दलघमी आहे. सध्या प्रकल्पात ११५८ दलघमी पाणी आहे. नवेगाव खैरी प्रकल्पाची साठवण क्षमता १८०.९८ दलघमी असून सध्या या प्रकल्पात १४७.२५ दलघमी जलसाठा आहे. गेल्या वर्षी या कालावधीत तोतलाडोह प्रकल्पात १३.१ टक्के तर नवेगाव खेरी प्रकल्पात ३९.५८ टक्के साठा होता.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात