शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

वंदे मातरम् स्पर्धेमुळे नागपूर शहराला वेगळी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:47 AM

महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार : मॉडर्न पब्लिक, द रॉयल गोंडवाना, द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्यूट गटनिहाय विजेते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.महापालिके तर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात महापौर बोलत होत्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीत इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोड, ६ ते ८ वी गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर व पहिली ते पाचवी गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्यूटने बाजी मारीत गटनिहाय विजेतेपद पटकावले. विजेत्यांना महापौरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत मनपाच्या १९ व इतर ८२ अशा एकूण १०१ शाळांनी सहभाग घेतला.बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंदे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, देवेन दस्तुरे यांच्यासह अंतिम फेरीचे परीक्षक शहरातील सुप्रसिद्ध गायक एम.ए. कादर, सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर, आशुतोष पळसकर उपस्थित होते.प्रथम क्रमांक विजेत्यांना १० हजार पुरस्कारमहापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेमध्ये इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोडने प्रथम, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर त्रिमूर्तीनगरने द्वितीय, ललिता पब्लिक स्कूल वर्धमाननगर कोराडी रोड संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय मनपाच्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ६ ते ८ वी या गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर श्रीकृष्णनगर, साऊथ पॉर्इंट स्कूल ओंकारनगरने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान राखले. संजुबा हायस्कूल बहादुराने उत्तेजनार्थ व नेताजी मार्के ट हिंदी माध्यमिक मनपा शाळेने प्रोत्साहनपर पुरस्कार पटकाविला. पहिली ते पाचवीच्या गटात द ब्लार्इंड बॉईज इन्स्टिट्यूटने पहिला, जुना सुभेदार ले-आऊट मानेवाडा येथील दुर्गानगर उच्च प्राथामिक शाळेने दुसरा व द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर संघाने तिसरा क्रमांक मिळविला. या गटात ग्रेट ब्रिटेन कॉन्व्हेंट शांतिनगर व आदर्श संस्कार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने क्रमश: उत्तेजनार्थ व प्रोत्साहन पुरस्कार मिळविले. तिन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकाविणाºया संघांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार व विजयी चषक प्रदान करण्यात आले. दुसºया स्थानावरील विजेत्यांना सात हजार रोख तर तिसºया क्रमांकावरील विजेत्यांना पाच हजार रुपये रोख पुरस्कारासह चषक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या शाळांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, माधुरी धवड, संध्या पवार, लता कनाटे व मधु कराड यांना नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका