शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

बेशिस्तांना चाप लावण्यासाठी शहर काँग्रेसची अचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 21:15 IST

निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसतो. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका विचारात घेता बेशिस्तांना चाप लावण्यासाठी पक्षात शिस्त असावी यासाठी शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी शिस्तपालन आचारसंहिता लागू करण्याबाबतचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देबैठकीत सर्वानुमते ठराव : अखिल भारतीय काँग्रेसच्या आचारसंहितेनुसार कामकाज

लोकमत न्यूज नेटर्कनागपूर : काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गटबाजी व पक्षविरोधी कारवाया सुरू आहेत. पक्षाच्या बळावर पदे भोगणारे वा निवडून येणारे बेशिस्त वागतात. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसतो. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका विचारात घेता बेशिस्तांना चाप लावण्यासाठी पक्षात शिस्त असावी यासाठी शहर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी शिस्तपालन आचारसंहिता लागू करण्याबाबतचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने पक्षातून निष्कासित केले आहे. या निर्णयानंतर देवडिया काँग्रेस भवन येथे प्रथमच होणाऱ्या शहर काँग्रेसच्या बैठकीकडे सर्वांंचे लक्ष लागले होते. शहर काँग्र्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अ.भा.कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी,महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेश अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी शिस्तपालन करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयावर कार्यकारिणीत चर्चा करण्यात आली.पक्षातील सकारात्मक गटबाजी हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु पक्षाच्या संघटनेला महत्त्व न देता स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाला नुकसान करणारी बेशिस्त योग्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी संघटनात्मक बांधणी सोबतच पक्षातील गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याची भमिका विकास ठाकरे यांनी मांडली.शहर उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड.अभिजित वंजारी, रमण ठवकर, उमेश शाहू, मुजीब भाई, जयंत लुटे, अनिल शर्मा आदींनी शिस्तपालन आचारसंहिंता लागू करण्यावर आपली भूमिका मांडली. सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला. पक्षात शिस्त असावी यासाठी सर्वसंमतीने शिस्तपालन आचारसंहितेचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रदेश काँग्रेसच्या मंजुरीनंतर व अखिल भारतीय काँग्रेसच्या अचारसंहितेनुसार या निर्णयाची अंमलबजावणी के ली जाणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.

 

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस