शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शहर बसचा प्रवास २० टक्क्यांनी महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:33 IST

‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागाला बसत असल्याने, विभागाने टप्प्यामागे दोन रुपये तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव २ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहर बसचे भाडे २० टक्के वाढणार आहे.

ठळक मुद्देटप्प्यामागे दोन रुपये दरवाढीचा प्रस्ताव : मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागाला बसत असल्याने, विभागाने टप्प्यामागे दोन रुपये तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव २ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहर बसचे भाडे २० टक्के वाढणार आहे.सध्या प्रवाशांना २ किलोमीटरसाठी ८ रुपये द्यावे लागत होते. आता, त्यांना १० रुपये द्यावे लागेल. महापालिकेच्या परिवहन समितीच्या २१ मार्चच्या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला होता. महापालिका शहर परिवहन सेवेचे संचालन करीत असली तरी रेड बस व ग्रीन बससाठी महापालिकेने चार आॅपरेटर नियुक्त केलेले आहेत. शहरात आॅपरेटरच्या व महापालिकेच्या मालकीच्या २३७ सर्वसाधारण रेड बसेस अशा एकूण ३८७ बसेस धावत आहेत.महापालिका व आॅपरेटरमध्ये झालेल्या करारानुसार मंजूर निविदांचे दर तसेच डिझेल दर, कर्मचारी वेतन, बसचे सुटेभाग यात वाढ झाल्यास त्याअनुषंगाने वाढीव दर निश्चित करून रेड बस आॅपरेटर्सना मासिक परतफेड करावी लागते. मार्च, २०१७ मध्ये डिझेलचे दर ६२.५७ रुपये प्रति लिटर होते. एप्रिल २०१८ मध्ये ६९.१२ रुपये प्रति लिटर एवढी वाढ झाली; म्हणजे ६.५५ रुपये एवढी प्रति लिटर वाढ डिझेलमध्ये झाली. कर्मचाºयांच्या वेतनातदेखील वृद्धी करण्यात आली. त्यानुसार तीन रेड बस आॅपरेटर्सना मिडीकरिता ४६.९० रुपये व रेड स्टॅन्डर्ड बसकरिता ५२.१६ रुपये प्रति किलोमीटर एवढी परतफेड महापालिकेला करावी लागते. ५ डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५५ कोटी ६२ लाख १५ हजार ८९५ एवढे उत्पन्न झाले. त्यातुलनेत महापालिकेने रेड बसच्या तीन आॅपरेटर्सला १०८ कोटी ९ लाख ६७ हजार ५२५ रुपये एवढी रक्कम दिली. या काळात ५२ कोटी ४७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा तोटा झाला असल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे परिवहन समितीने म्हटले आहे.ग्रीन बसची भाडेकपात कशासाठी?महापालिकेची परिवहन सेवा तोट्यात असल्याने रेड बसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे. मात्र तोटा असूनही ग्रीन बसच्या भाड्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन रुपयांनी कपात केली होती. तोट्यात असूनही कपात कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरFairजत्रा