शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  अल्पवयीन मजुराला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:39 IST

नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कामठीतील एका हार्डवेअर व्यापाऱ्याने बाल मजुरास बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेला बाल मजूर स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. परंतु वेळीच घटना उघडकीस आल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देहार्डवेअर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल : जुनी कामठीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याने कामठीतील एका हार्डवेअर व्यापाऱ्याने बाल मजुरास बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेला बाल मजूर स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. परंतु वेळीच घटना उघडकीस आल्याने अनर्थ टळला.पोलीस सूत्रानुसार कल्पतरू कॉलनी येथील सुशील रावलानी याचे रुईगंज सिरीया मैदान येथे हार्डवेअरचे दुकान आहे. रावलानीने तीन-चार महिन्यांपूर्वी १५ वर्षाच्या एका बाल मजुरास आपल्या दुकानात कामावर ठेवले होते. अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करून घर चालवते. आईला मदत म्हणून अल्पवयीन मुलगाही काम करू लागला. त्याला साडे तीन हजार रुपये महिना वेतन दिले जात होते. काही दिवसानंतरच त्याला रावलानी यांचा स्वभाव पसंद आला नाही. परंतु गरज असल्याने नाईलाजास्तव त्याने काम सुरू ठेवले. परंतु काही दिवसांपासून तो नोकरी सोडण्याच्या तयारीत होता. मुलाच्या तक्रारीनुसार १६ मार्च रोजी रात्री रावलानीने काम न सोडण्याची धमकी देत त्याला बेल्टने मारहाण केली. या घटनेमुळे तो अतिशय दुखावला गेला. तो स्वत:ला नुकसान पोहोचवण्याच्या तयारीत होता. त्याची अवस्था पाहून आई व इतर लोकांना संशय आला. त्यांनी अधिक विचारपूस केली असता मुलाने घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासानंतर गुन्हा दाखल केला. रावलानी यांनी मात्र मारहाण केल्याचे नाकारले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा