Nagpur businessman pleads guilty to drug trafficking in US court | नागपूरच्या व्यावसायिकाने औषधे तस्करीच्या गुन्ह्याची अमेरिकन न्यायालयात दिली कबुली
नागपूरच्या व्यावसायिकाने औषधे तस्करीच्या गुन्ह्याची अमेरिकन न्यायालयात दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकन फॉर्मासिटीकल औषधी बेकायदेशीरपणे आयात केल्याची कबुली झेक प्रजासत्ताकने अमेरिकेला प्रत्यार्पित केलेल्या एका भारतीय व्यावसायिकाने फेडरल कोर्टात दिली. जितेंद्र हरीश बेलानी (३७) असे या व्यावसायिकाचे नाव असून तो मुळचा नागपूरचा आहे.
प्राप्त माहितनुसार नागपूर येथील जितेंद्र हरीश बेलानी (३७) यांनी पिट्सबर्ग फेडरल कोर्टात सोमवारी मुख्य फेडरल जिल्हा न्यायाधीश मार्क हॉर्नक यांच्याकडे ही कबुली दिली. फिर्यादी स्कॉट ब्रॅडी ही माहिती दिली.
तपासणी टाळण्यासाठी त्याने केवळ डॉक्टरांच्या निर्देशानुसारच विकल्या जाऊ शकणाऱ्या औषध असल्याचे कस्टमला खोटी माहिती दिली आणि ही औषधे वेगवेगळ्या पत्त्यावर पाठवली. याप्रकरणी जितेंद्रला जूनच्या सुरुवातीला झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याच महिन्यात त्याच्यावर बेकायदेशीर औषधी विक्रीचा आरोप ठेवण्यात आला होता. फिर्यादी ब्रॅडीच्या यांच्यानुसार, ही औषधे त्यांनी भारतातील एका कंपनीकडून अमेरिकेत आयात केली. त्यासाठी वेबसाइट सुद्धा ठेवली होती.
तस्करीच्या औषधांमध्ये घातक घटकांचा समावेश असल्याने त्याचा मानवी शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतो. त्यामुळे या औषधांच्या विक्रीवरअमेरिकेत बंदी आहे. औषधांची तस्क्ररी करतांना भारत आणि इतर देशांमधून माझ्या खात्यात पैसे पाठवल्याची कबुलीही जितेंद्रने दिल्याची माहिती ब्रॅँडी यांनी दिली.

Web Title: Nagpur businessman pleads guilty to drug trafficking in US court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.