शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

नागपुरात इमारत बांधकाम परवानगी आता पोर्टलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:00 IST

राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल.

ठळक मुद्दे२५ जुलैपासून सुरुवात : बीपीएमएसचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने नगर परिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसूत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार केले आहे. हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल.शनिवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रमुख उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांना अगोदर बीपीएमएस पोर्टल अथवा राज्यशासनाच्या ‘महावास्तू’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. त्याची पडताळणीही आॅनलाईन पद्धतीनेच मनपातील लिपिकाकडून त्यावर शेरा देतील. यानंतर इमारत बांधकाम परवानगी संदर्भातील पुढील प्रक्रिया करता येणार आहे.फाईलच्या मनस्तापापासून सुटकाया संपूर्ण प्रक्रियेमुळे सर्वांचेच काम सुलभ होणार असून वेळेची बचत होणार आहे. विशेष म्हणजे परवानगीसाठी अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या फाईलच्या मनस्तापासून सुटका मिळणार आहे. 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर