शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नागपूर मनपाचा २६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 18:20 IST

मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षासाठी २६६९.३३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. यात ६८.३५ टक्के शासकीय अनुदानाचा वाटा आहे.

ठळक मुद्देशासकीय अनुदानाचा ६८.३५ टक्के वाटा

नागपूर : कोरोनामुळे मागील दोन वर्षात नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. नागपूरकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ वा दरवाढ करण्यात आलेली नाही. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षासाठी २६६९.३३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. यात ६८.३५ टक्के शासकीय अनुदानाचा वाटा आहे.

नागपूर शहरात सुरू असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांतील मनपाच्या आर्थिक सहभागासाठी तरतूद केली आहे. सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. १ हजार ५१८ कोटींची महसुली कामे, तर १ हजार कोटींचा भांडवली खर्च प्रस्तावित आहे. परिवहन विभागासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टप्पा २ व ३ मधील सिमेंट रस्त्यासाठी १६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शिक्षण व पथदिवे यासह मूलभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे. विशेष अशा नवीन योजनांचा समावेश नाही.

पुढील वर्षात जीएसटी अनुदानातून १४०६.७३ कोटी, तर मुद्रांक शुल्कातून १७.०८ कोटी अपेक्षित आहे. मनपाचे आर्थिक स्रोत मर्यादित असले तरी मालमत्ता करातून २२० कोटी, पाणीपट्टीतून २०० कोटी, नगररचना विभागाकडून ११९.७५ कोटी, बाजार विभाग १३.७१ कोटी, स्थावर विभाग ६.३० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. ऑरेंज स्ट्रीट प्रकल्पातून पुढील दोन वर्षात ३२५ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे.

अर्थसंकल्प सादर करताना प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बिलीन खडसे यांच्यासह मनपातील अधिकारी उपस्थित होते.

बस दरवाढीचे संकेत

मागील काही महिन्यात पेट्रोलियम पदार्थांचे दर प्रचंड वाढले आहे. यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागावरील आर्थिक बोजा वाढला आहे. परिणामी तोटा वाढत असून, दर महिन्याचा खर्च १३ ते १४ कोटी आणि उत्पन्न मात्र ५ कोटीच्या आसपास आहे. याचा विचार करता आपली बसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचे संकेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. परिवहन समितीने विभागाचा अर्थसंकल्प मांडताना प्रशासनाचा भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता. आता प्रशासकीय राजवट असल्याने १५ ते १७ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2022