नागपूर - दीक्षाभूमीवर निळा महासागर
By Admin | Updated: October 11, 2016 21:45 IST2016-10-11T21:43:39+5:302016-10-11T21:45:44+5:30
60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर

नागपूर - दीक्षाभूमीवर निळा महासागर
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - 60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.