शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

Nawab Malik: 'नवाब मलिकांची औकात फक्त १ रुपयाची म्हणून...', मुन्ना यादवनं आरोप फेटाळले, कोर्टात जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:00 IST

Munna Yadav replay to Nawb Malik: मलिक यांनी ज्या मुन्ना यादव यांचा उल्लेख केला त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

नागपूर-

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला. समीर वानखे़डे, मुन्ना यादव, हैदर आझम आणि बनावट नोटा प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी फडणवीसांवर खळबळजनक आरोप केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ सुरु असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याचे दिसून येत आहे. मलिक यांनी ज्या मुन्ना यादव यांचा उल्लेख केला त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.  

"नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाहीत", असे म्हणत भाजप नेते मुन्ना यादव  यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी मुन्ना यादव यांचं नाव घेत एका गुंडाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाचा अध्यक्ष केल्याचा आरोप केला होता. मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे आहेत असा दावाही मलिक यांनी केला. मात्र, मुन्ना यादव यांनी मालिकांचे सर्व आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहेत, असे मत व्यक्त केले.

मलिकांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे ही मुन्ना यादव यांनी जाहीर केले आहे. "नवाब मलिक यांची औकात १ रुपयाची आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा देखील एक रुपयाचाच ठोकणार. त्यांनाही माझं आवाहन आहे की माझी चौकशी करावी. माझ्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यास घेईन. पण मी कोर्टात जाणार आणि तिथं नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध करणार", असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे सुरुवातीला स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदार संघातील चुनाभट्टी परिसरातून नगरसेवक होते. यादव हे नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखले जातात. मुन्ना यादवच्या समर्थनास आणि नवाब मलिकांच्या विरोधात आज नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. तर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केलाय. या घटनेनंन्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तणावाची स्थितीत निर्माण झाली आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस