शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड

By नरेश डोंगरे | Updated: July 27, 2024 21:11 IST

Nagpur Crime News: रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले. मनोज कुमार ग्यानदिन (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो ठिकठिकाणच्या रेल्वे पोलिसांना वॉन्टेड असल्याचीही माहिती आहे.

उत्तर पश्चिमी दिल्लीतील अशोक विहारात राहणारा हा भामटा गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत 'जहरखुराणी'च्या गुन्हेगारीत सक्रिय आहे. विविध मार्गावरील रेल्वे गाडीत बसून तो बाजुच्या प्रवाशांसोबत सलगी साधतो. त्यांच्याशी लाडीगोडीने वागून सहप्रवाशाचा विश्वास संपादन केल्यानंतर हा भामटा त्या प्रवाशाला खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थात विशाक्त पदार्थ देतो (याला जहरखुराणी म्हणतात). त्यामुळे सहप्रवासी बेशुद्ध होतो आणि नंतर हा भामटा त्यांचे दागिने, माैल्यवान चिजवस्तू आणि सामान घेऊन पळून जातो. अहमदाबाद -हावडा एक्सप्रेसच्या कोच नंबर एस-४ मध्ये ६ जुलैला दिव्येश अटलबिहारी सक्सेना (रा. सॉल्ट लेक, कोलकाता) हे प्रवास करीत होते. आरोपी मनोजने त्यांच्याशी आधी लाडीगोडीने वागून नंतर त्यांना विषाक्त पदार्थ खायला दिला. ते बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने त्यांची बॅग चोरून पळ काढला. सक्सेना शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हावडा रेल्वे स्थानकावर त्याची तक्रार नोंदवली. ही घटना डोंगरगड जवळ घडली होती. त्यामुळे डोंगरगड रेल्वे पोलिसांनी नागपूर विभागातील सर्व पोलीस ठाणे आणि आरपीएफला कागदोपत्री पाठवून आरोपीला शोधण्यासाठी त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाठविले.

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठांनी या आरोपीला पकडण्यासाठी सलग दोन आठवडे प्रयत्न केले. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून या भामट्याचा छडा लागला. त्यावरून त्याला २५ जुलैला भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ३०५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तो ठिकठिकाणच्या रेल्वे पोलिसांना वॉन्टेड होता. दुसऱ्या सावजाच्या होता शोधातआरोपी मनोज हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला आरपीएफने प्रवासाच्या तयारीत असताना दिल्लीत ताब्यात घेतले. त्याच्याजवळच्या बॅगची तपासणी केली असता त्यात खाण्यापिण्याच्या चिजवस्तूंसह विषाक्त औषध (जहरखुरानी) आढळले. तो नेहमीप्रमाणे दुसरे सावज शोधण्यासाठी निघाला होता, हेसुद्धा त्यातून उघड झाले. विविध प्रांतात १८ गुन्हे दाखलआरोपी मनोजची चाैकशी केली असता त्याच्याविरुद्ध रेल्वे पोलीस अलिगढ, बरेली, मुरादाबाद सह विविध प्रांतातील रेल्वे पोलीस ठाण्यात विषाक्त पदार्थ देऊन लुटण्याचे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राथमिक चाैकशीतून पुढे आली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी