शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

नागपुरात भिकाऱ्यांनी घेतला भिकाऱ्याचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 22:00 IST

दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले.

ठळक मुद्देहत्या करून पोहोचले ठाण्यात : धंतोली परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनी मंदिर मार्गावरच्या फूटपाथवर शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.नंदकिशोर जीवन नंदनवार (रा. रायपूर, हिंगणा) आणि सोनू ऊर्फ सोहेल खान बाबू खान अशी आरोपींची नावे आहेत. मृताचे नाव सोनू असल्याचे पोलीस सांगतात. त्याचे पूर्ण नाव आणि सविस्तर माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही. आरोपी नंदकिशोर नंदनवार सोहेल खान आणि मृत सोनू हे कॉटन मार्केट चौक परिसरात दिवसभर इकडे-तिकडे फिरायचे. मिळेल ते खायचे आणि फूटपाथवर झोपायचे. इकडे-तिकडे भटकताना कोणती काही चिजवस्तू आढळल्यास ते विकून त्यातून आलेल्या पैशातून ते दारू पीत होते. आजूबाजूला राहत असल्यामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी व्हायची.काही दिवसांपासून सोनूसोबत एका महिलेची ओळख झाली. ती नेहमी त्याच्याकडे यायची. त्यामुळे आरोपी नंदनवार आणि खान हे दोघे त्याला टोचून बोलत होते. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला सुरुवात झाली. पाहता पाहता ते एकमेकांना मारहाण करू लागले. एवढ्यात आरोपी नंदनवार आणि खान यांनी फूटपाथवर पडलेले सिमेंटचे गट्टू उचलून सोनूच्या डोक्यावर मारले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे आरोपी घाबरले. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी तेथून पळाले आणि सरळ धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना झालेली घटना सांगितली. एएसआय शेखर सरोदे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी सोनुला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी नंदनवार आणि खान या दोघांना हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. मृत सोनूबाबत रात्रीपर्यंत सविस्तर माहिती मिळाली नसल्याचे पोलीस सांगत होते.यापूर्वीही घडली होती घटनाकाही दिवसांपूर्वी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील चौकातील उड्डाण पुलाखाली एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्या वर अशाच प्रकारे सिमेंटच्या गट्टूने हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून