शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर ठरले देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:52 IST

Nagpur : नागपूर समृद्धी सर्कल गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण का?

चंद्रकांत दडस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर ठरले आहे. मिहान, समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो सारखे महत्त्वाचे प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. हे शहर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे, जे संपूर्ण भारतातील लक्ष वेधून घेत असल्याचे कोलियर्स इंडियाच्या अहवालात समोर आले आहे. जयपूर आणि लखनौ ही शहरे नागपूरनंतर सर्वात वेगाने वाढणारी शहरे ठरली आहेत.

रिअल इस्टेट सल्लागार संस्था कोलियर्स इंडियाने उभरत्या शहरांच्या विकासाची मूल्ये जाणून घेण्यासाठी एका व्यापक मापदंड-आधारित विश्लेषण केले. हे विश्लेषण भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, लोकसंख्याशास्त्रीय वाढ आणि आर्थिक विकास तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ यावर आधारित होते. हा विकास आर्थिक वाढीला गती देतो, टाउनशिप व पायाभूत सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळते. यामुळे घरांची मागणी वाढते, असे अहवालात म्हटले आहे. 

नागपूर विकसित होणारे शहर का ठरले?

  • लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील १३ व्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले १ नागपूर हे एक प्रमुख औद्योगिक केंद्र निर्माण झाले आहे. 
  • क्षेत्रफळानुसार आशियातील सर्वात मोठे 5 बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र आणि हिंगणा ही औद्योगिक वसाहत येथे उभी राहिली असून, ते सुमारे ९०० एमएसएमईचे घर आहे. 
  • मिहानने हे देशातील पहिले बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र येथे असून, ते आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून आहे. 
  • नागपूरचे मध्यवर्ती स्थान आणि पाच एक्सप्रेसवेशी कनेक्टिव्हिटीमुळे ते एक पसंतीचे गुंतवणूक स्थळ बनले आहे. 
  • नागपूर-मुंबई एक्सप्रेसवेला लागून असलेल्या र या भागात पॅन इंडिया ग्रेड ए डेव्हलपर्सच्या उपस्थितीमुळे रिअल इस्टेट विकासाच्या बाबतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

समृद्धी सर्कल गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण का?

  • नागपूरला मुंबईशी जोडणारा हा ७०१ किमी लांबीचा महामार्ग नागपूरच्या विकासासाठी एक प्रमुख प्रकल्प आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ १६ तासांवरून ८ तासांवर आला आहे.
  • लॉजिस्टिक आणि औद्योगिक केंद्रे उभी राहिली आहेत. यामुळे नोकरीची संधी वाढणार असून घरांच्या आणि व्यावसायिक ठिकाणांच्या किमती वाढणार आहेत.
  • एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे या प्रदेशातील पर्यटनाला लक्षणीयरीत्या चालना मिळाली आहे. पर्यटकांना महाबळेश्वर, शिर्डी, वेरूळ, गोवा आणि नागपूरजवळील वन्यजीव अभयारण्य पाहणे सोपे झाले आहे.
  • आयआयएम, एनएलयू, डी. वाय. पाटील स्कूल आणि एआयआयएमएस, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारख्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक.
  • महाराष्ट्र सरकार एक्सप्रेस वेवर २४ टाउनशिप (नोडस) विकसित करण्याची योजना आखत आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.
  • समृद्धी महामार्ग एक्स्प्रेसवेची घोषणा झाल्यापासून, समृद्धी सर्कलभोवती विविध टाउनशिप विकसित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ते गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनले आहे.

प्रमुख आकर्षणे रामटेक मंदिर, श्री गणेश मंदिर टेकडी, थीम पार्क, वन्यजीव अभयारण्य

हायलाईट्स नागपूर लोकसंख्या (२०२४) - ३१,०६,००० प्रमुख आयटी कंपन्या - ग्लोबल लॉजिक, असेंचर, एचसीएल, टेक महिंद्रा इंडस्ट्रीअल हब - हिंगणा आणि बुटीबोरी एमआयडीसी हब दरडोई उत्पन्न (२०२०-२१) - २,२१,०९७ रुपये

ही ठिकाणे ठरणार गेमचेंजर हिंगणा एमआयडीसीच्या जवळ असल्याने निवासी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. समृद्धी सर्कल संपूर्ण भारतातील विकासकांकडून येथे विकासक येत असून, एक लक्झरी निवासी सूक्ष्म बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. वर्धा रोड / बेसा उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि जमिनीच्या उपलब्धतेमुळे निवासी मालमत्तांसाठी मोठी मागणी अनुभवत आहे. शिवमडका नागपूरच्या प्रमुख भागांशी कनेक्टिव्हिटी असून, नवीन निवासी प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळत आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर