शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपुरात बारसमोर कुख्यात गुंडावर हल्ला : चाकूने भोसकले, विटांनी ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:58 IST

प्रतापनगर - एमआयडीसीतील कुख्यात गुंड शेरा ऊर्फ विक्की चव्हाण याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला. चाकूचे घाव घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपींनी शेराला विटांनी ठेचले. यात शेरा गंभीर जखमी झाला. भरदुपारी ४. ३० च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल बारच्या समोर हा थरार घडला. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देप्रतिस्पर्धी गुन्हेगारांनी काढला वचपा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर - एमआयडीसीतील कुख्यात गुंड शेरा ऊर्फ विक्की चव्हाण याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला. चाकूचे घाव घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपींनी शेराला विटांनी ठेचले. यात शेरा गंभीर जखमी झाला. भरदुपारी ४. ३० च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल बारच्या समोर हा थरार घडला. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.एमआयडीसीतील कुख्यात गुंड आणि जुगार क्लब चालविणारा गणेश मेश्राम याचा शेरा नंबरकारी (गुन्ह्यातील साथीदार) होय. दुहेरी हत्याकांडासह त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्यांनी आल्याआल्याच पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. शेराने एका आठवड्यापूर्वी प्रतिस्पर्धी टोळीतील निखिल नामक गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. निखिलसह प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड तेव्हापासून शेराच्या मागावर होते. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास जयताळ्यातील जयस्वाल बारमध्ये शेरा त्याच्या साथीदारासोबत दारू प्यायला गेला. आरोपींनी ते बघितले. त्यानंतर चार ते सहा आरोपी शस्त्र घेऊन बारसमोर दबा धरून बसले. शेरा बारच्या बाहेर पडताच आरोपींनी त्याच्यावर झडप घातली. शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपींनी त्याला बाजूच्या विटा उचलून ठेचून काढले. आरडाओरड ऐकून बारमधील तसेच रस्त्यावरील मंडळी धावली. शेरावर निर्घृण हल्ला होताना अनेकांनी बघितले. त्यामुळे बारमधील मद्यपी आरडाओरड करीत पळून गेले तर रस्त्यावरच्या मंडळींनी समोर मोठी गर्दी केली. बारचालकाने पोलिसांना फोन केला. त्यामुळे सोनेगाव आणि प्रतापनगर पोलीस तसेच गुन्हेशाखेचा ताफा घटनास्थळी पोहचले. तत्पूर्वीच आरोपी पळून गेले होते. घटनास्थळ प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्रतापनगर पोलिसांनी तपास सुरू केला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन माहिती जाणून घेतली. बारच्या आतबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी विविध भागात पोलीस पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेतील शेराला खामल्यातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

वर्चस्व आणि दहशतमेश्राम, शेरा आणि त्यांच्या साथीदारांनी गेल्या वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुन्हेगार बादल शंभरकर आणि गुरू बादशा या दोघांची निर्घृण हत्या केली होती, तर त्यांच्या साथीदाराला गंभीर जखमी केले होते. दुचाकीवर जाणाऱ्या बादल, गुरू आणि साथीदाराला आरोपींनी कारने जोरदार धडक मारून खाली पाडले आणि त्यांच्यावर लोखंडी रॉड तसेच शस्त्राने हल्ला चढवून दोघांना ठार मारले होते. कडाक्याच्या थंडीत पहाटेच्या वेळी हे हत्याकांड घडले होते. प्रारंभी तो अपघात वाटत होता. मात्र, घटनास्थळाजवळ असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे तो अपघात नाही तर घातपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर शेराने टोळी बनवून हप्ता वसुली करणे, दहशत पसरविणे सुरू केले होते. निखिल खरातवर हल्ला चढवून शेराने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच ही घटना घडली. वृत्त लिहिस्तोवर प्रतापनगर पोलिसांनी निखिलसह काही संशयितांना ताब्यात घेतले होते. एमआयडीसीतही गुंडांचा तरुणावर हल्ला एमआयडीसीतही गुंडांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला चढवला. रोहित सिंग ओमप्रकाश सिंग (वय २४, रा. मातोश्रीनगर) हा मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास त्याच्या एमआयडीसीतील श्रीकृष्ण ऑटोमोबाईल्समध्ये बसून होता. आरोपी संजू जावडे त्याच्या चार साथीदारांसह दुकानात धडकला आणि जुन्या वादातून आरोपींनी चाकू तसेच लोखंडी रॉडने सिंगवर हल्ला चढवला. डोक्यावर तसेच हातापायावर वार करून आरोपी पळून गेले. या हल्ल्यात सिंग गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी सिंगच्या बयानावरून आरोपी जावडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.   गुन्हेगारांची वळवळ  शहरातील गुन्हेगारांची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. एकमेकांवर हल्ले चढवून त्यांनी आपले वर्चस्व दाखविण्यासाठी दहशत पसरविणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री कळमन्यात कुख्यात गुंड कृष्णा याने कुख्यात रमेश काल्यावर हल्ला चढवून त्याचा पंजा छाटला. तर, बुधवारी भोला खान नामक गुंडावर कुख्यात गुड्डू आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला चढवला. आज गुरुवारी कुख्यात शेरावर निखिल खरात आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला चढवला. तीन दिवसांतील या तीन घटना गुन्हेगारांमधील आपसी वैमनस्य उफाळून येत असल्याचे आणि वर्चस्वासाठी गुन्हेगारांची वळवळ सुरू झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर