शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:42 IST

भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्यालयाचे नुकसान केले. या बाबीचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीसमोर निषेध करून निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची नारेबाजी : काळ्या फिती लावून केले काम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्यालयाचे नुकसान केले. या बाबीचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीसमोर निषेध करून निदर्शने करण्यात आली.यावलकर यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना शिबिराच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. तसेच शासकीय कार्यालयातील तावदाने तोडून कार्यालयाचे नुकसान करण्यात आले. या घटनेचा विदर्भातील सर्व कामगार कार्यालयांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. काळ्या फिती लावून दिवसभर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले. प्रशासकीय इमारत २ मधील सर्व कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी कामबंद आंदोलन करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूरच्या वतीनेही सार्वजनिक बांधकाम विभागातील महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतणे, कामगार आयुक्त कार्यालयात रवींद्र यावलकर यांना मारहाण करण्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. जुने सचिवालय परिसर सिव्हिल लाईन्स येथे संघटनेच्या वतीने नारे-निदर्शने करून घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर कामगार कार्यालयात आयुक्तांना भेटून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, नागपूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, श्याम वांदिले, नाना कडबे, यशवंत कडू, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शेंडे, मंगला जाळेकर, केशव शास्त्री, स्नेहल खवले, मनीष किरपाल, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत, पद्मा सलामे, विनोद पारजवार, संजय तांदुळकर,वंदना परिहार, गौतम धोंगडी, धनंजय डबाळ, गजानन जाधव उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारी