शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील एटीएममध्ये ठणठणाट !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:31 IST

देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपैसे निघत नसल्याने नागरिक त्रस्त : ‘नो कॅश’चे बोर्ड लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.लोकमतने शहरातील विविध भागात लागलेल्या एटीएमचा आढावा घेतला असता, बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याचे आढळून आले. काही एटीएमच्या बाहेर तर ‘नो कॅश’चे बोर्ड लागले आहेत. काही ठिकाणी तर एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही पैसे मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत. काही राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम तांत्रिक कारणांमुळे बंद पडले आहेत. एटीएममधून पैसेच मिळत नसल्याने आता नागरिकांना नोटाबंदीचे दिवस आठवू लागले आहेत. लोकमत चमूच्या पाहणीदरम्यान, पैसे काढण्यासाठी भटकणारे अनेक नागरिक दिसून आले. चार-पाच एटीएम फिरल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.शहरातील बाजारपेठांच्या आसपास एटीएमची संख्या जास्त आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी हे एटीएम लावण्यात आले होते. मात्र, बाजार परिसरातील एटीएममध्येही कॅश नाही. लोकमतने गांधीबाग, गोळीबार चौकातील एटीएमची पाहणी केली असता, येथे दोन्ही राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे आढळून आले. एसबीआयच्या एटीएममधून एक व्यक्ती बाहेर पडला. त्याने हातातील पावती दाखवीत कॅश नसल्याचे सांगितले. याच चौकातील दुसºया एटीएमसमोर कॅश उपलब्ध नसल्याचा बोर्ड लागला होता. गोळीबार चौकातील अन्य दोन एटीएमही बंद होते. नंगा पुतळा चौकात यूबीआयच्या दोन एटीएमपैकी एकामध्ये रोख उपलब्ध नव्हती. छावणीच्या अचरज टाऊन चौकातील एका राष्ट्रीय बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने कॅश नसल्याचे सांगितले. फ वारा चौक, नंदनवन, मेडिकल चौक, धंतोली येथीलही बहुतांश एटीएम बंद आढळले.२०० च्या नोटांचे दर्शनच नाही नोटाबंदीनंतर बाजारत २०० ची नवीन नोट आली. मात्र, या नोटेसाठी एटीएमच्या रचनेत आवश्यक बदल न करण्यात आल्यामुळे एटीएममधून २०० ची नोट निघत नाही. ज्यांना २०० ची नोट मिळत आहे ते ती खर्च करणे टाळत आहेत. बँकेतून पैसे काढतानाही २०० च्या नोटा मर्यादित मिळत आहेत. त्यामुळे चलनात २०० च्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे.

टॅग्स :bankबँकatmएटीएम