शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

नागपुरात सहायक मोटर वाहन निरीक्षक लाचेच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 21:35 IST

तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले.

ठळक मुद्देदोन हजाराची लाच भोवली : दलालही गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. मिथून डोंगरे (वय ३८, एआरटीओ) आणि मुकेश रामटेके (वय ३६, दलाल), अशी आरोपींची नावे आहेत.तक्रारदार झिंगाबाई टाकळीत राहतात. त्यांनी दुचाकीचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी सिव्हिल लाईनमधील आरटीओ कार्यालयात रीतसर अर्ज दिला होता. संबंधित कागदपत्रेही जोडली होती. लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी तक्रारदार प्रयत्नरत असताना त्यांना मुकेश रामटेके भेटला. तुम्हाला अर्जंट लर्निंग लायसन्स मिळवून देतो, त्यासाठी दोन हजार रुपयाची लाच द्यावी लागेल, असे रामटेके म्हणाला. ही लाच एआरटीओ मिथून डोंगरे यांच्यासाठी असल्याचेही मुकेश म्हणाला. तक्रारदारकर्त्यांनी मिथून डोंगरेची भेट घेतली असता त्यानेही दोन हजाराची लाच दिल्यास तात्काळ लायसन्स देतो, असे म्हटले. आवश्यक कागदपत्रे सादर केली असताना नाहक दोन हजार रुपये उकळू पाहणाºया या दोघांची तक्रार तक्रारदारांनी एसीबीकडे केली. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एसीबीच्या पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक गणेश कदम, हवालदार सुनील कळंबे, नायक रविकांत डहाट, सरोज बुधे, राजेश तिवारी यांनी सोमवारी दुपारी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार एआरटीओ डोंगरेकडे गेला. त्याने ही रक्कम रामटेकेला द्यायला सांगितली. रामटेकेने रक्कम स्वीकारताच साध्या वेशात बाजूलाच दबा धरून बसलेल्या डोंगरे आणि रामटेकेला एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. या दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.कार्यालयात भूकंपसिव्हिल लाईनमधील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आधी दलालाचाच सामना करावा लागतो. या दलालाला त्याने मागितल्याप्रमाणे रक्कम दिल्यास तात्काळ काम होते; अन्यथा छोट्या छोट्या त्रुटींवरून संबंधितांना हेलपाटे मारायला भाग पाडले जाते. दलालांशी अनेक अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने सहजपणे काम होते. आज एआरटीओसह दलालही पकडला गेल्याने कार्यालय परिसरात भूकंपासारखे वातावरण झाले. पाच मिनिटातच या कार्यालयातील बरेचसे दलाल पळून गेले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग