शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 07:59 IST

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत.

- जितेंद्र ढवळे/ नरेश डोंगरे/ योगेश पांडेनागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, सूत्रांनी स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या. सुमारे ५०० किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनेचे कारण अस्पष्ट‘लोकमत’ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते. पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या. गुरुवारी नऊ कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके, वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता माेठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यासदेखील वेळ मिळाला नाही. 

रोषाचा भडका : या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला. 

एक मीटरमागे दोन मिलीग्रॅम बारूदवात तयार करण्याची प्रक्रिया मशीनच्या माध्यमातून होत होती. त्याचे पॅकिंगचे काम कामगार करायचे. एक मीटर वातीमागे जवळपास दोन मिलीग्रॅम बारूद वापरण्यात येत होता. तेथे चारकोल, सल्फर, पोटॅशिअम होते. पॅकिंग झालेल्या वाती बॉक्समध्ये ठेवण्यात येत होत्या. एका अर्थाने त्या जिवंत वाती होत्या व घर्षणामुळे स्पार्क होऊन स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नेमके काय घडले?२२ एकरांत पसरलेल्या कंपनीत बारूद व फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासन थंड होते.दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहोचले. तोपर्यंत चार ते पाचजणांचा मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळी धाव : पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

 

टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट