नागपूर, अमरावतीमध्ये राज्यातील २५ टक्के रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:33 PM2021-02-18T12:33:39+5:302021-02-18T12:34:27+5:30

Nagpur News विदर्भातील अमरावती व नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून वेगाने रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. बुधवारी हे दोन्ही जिल्हे मिळून सुमारे अकराशे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले.

Nagpur, Amravati has 25% corona patients in the state | नागपूर, अमरावतीमध्ये राज्यातील २५ टक्के रुग्ण

नागपूर, अमरावतीमध्ये राज्यातील २५ टक्के रुग्ण

Next
ठळक मुद्दे कोरोनाबाबत वाढलेली बेफिकिरी, कमी झालेला मास्कचा वापर फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा आणि सॅनिटायझरच्या कमी झालेल्या वापरामुळे नागपुरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ३२८९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज बुधवारी


 लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर: विदर्भातील अमरावती व नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आठवडाभरापासून वेगाने रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. बुधवारी हे दोन्ही जिल्हे मिळून सुमारे अकराशे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले. राज्याच्या एकूण आकड्याच्या तुलनेत ही टक्केवारी जवळपास २५ टक्के इतकी आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सातत्याने जास्त रुग्ण आढळत असल्याचे चित्र आहे. दोन्ही जिल्हयांमध्ये तातडीने प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. विशेषत: दोन्ही जिल्हयातील ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. परंतु मागील सात दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. ११ फेब्रुवारी रोजी तब्बल ६६ दिवसांनंतर पहिल्यांदा ५०० नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही संख्या कमी होऊन ३१९ वर आली. परंतु १३ तारखेपासून १६ तारखेपर्यंत यात सातत्याने वाढ होत गेली. बुधवारी त्याने उच्चांक गाठला.

Web Title: Nagpur, Amravati has 25% corona patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.