शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपूर : बाद नोटा प्रकरणातील आरोपींची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:46 IST

पोलीस कोठडीतील चौकशीत तपास अधिका-यांची दिशाभूल करण्याचे तंत्र नोटा अदलाबदलीच्या धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी अवलंबले आहे.

नागपूर : पोलीस कोठडीतील चौकशीत तपास अधिका-यांची दिशाभूल करण्याचे तंत्र नोटा अदलाबदलीच्या धंद्यात गुंतलेल्या आरोपींनी अवलंबले आहे. त्यामुळे पोलिसांना ते दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. काही जण छाती दुखत असल्याचेही सांगून पोलिसांची चौकशी टाळत आहेत.

१ आॅगस्टला गुन्हे शाखेच्या पथकाने कोराडी रोडवरील वॉक्स कुलर चौकाजवळ राणा अपार्टमेंटमध्ये  छापा टाकला होता. त्यावेळी ३०१ क्रमांकाच्या सदनिकेत प्रसन्ना पारधी हा बिल्डर ९७ लाख ५० हजार रुपयाच्या जुन्या नोटांसह पोलिसांना आढळला होता. तर, पोलीस आल्याचे पाहून सदरमधील कापड व्यापारी कुमार चुगानी, रुषी खोसला आणि त्याचे साथीदार पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत होते. पोलिसांजवळ पळून गेलेल्या आरोपींची छायाचित्रे (सीसीटीव्ही इमेज) आणि मोबाईल नंबर होते. मात्र, त्यांनी ते नंबर बंद करून ठेवल्यामुळे पोलिसांची गोची झाली होती. तरीसुद्धा गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोली निरीक्षक सचिन लुले आणि त्यांच्या सहका-यांनी सोमवारी आणि मंगळवारी मुंबई तसेच अहमदनगरात छापेमारी करून अमित कांगने (वय ३२), नितीन नागरे (वय ३७, रा. कल्याण मुंबई),  नागेश कुसकर (वय ३०, रा. डोंबीवली, मुंबई ) आणि सचिन शिंदे (वय ३२, रा. संगमनेर) या चौघांना अटक केली. बुधवारी त्यांन ा नागपुरात आणून कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना  १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. तेव्हापासून पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. मात्र, चौकशीत आरोपी दिशाभूल करणारी माहिती देत आहे.  

अटकेतील या चौघांचा सूत्रधार अमित कांगणे आहे. नितीन नागरे वाहनचालक आहे. नागेश कुसकर बांधकाम व्यावसायिक असून, सचिन शिंदे शेतकरी असल्याचे सांगितले जाते. 

कांगनेला ५०० आणि  १०० कोटी रुपयांच्या नोटा बदलवून देण्याची हमी कुमार चुगानी आणि रुषी खोसला व त्यांच्या साथीदारांकडून मिळाल्याने तो नागपुरात आला होता. त्याने नागेश कुसकरची कार आणली होती. या कारमध्येच मोठ्या प्रमाणात नोटा होत्या.

 मात्र, त्या नोटा कुणाच्या होत्या, ते सांगायला आरोपी तयार नाहीत. प्रत्येक जण विसंगत माहिती देत आहे. 

 कुणी छाती दुखत असल्याचे सांगून तर कुणी ओका-या आल्यासारखे करून चौकशी टाळत आहेत.  त्यामुळे काळे धन बाळगणारे आणि त्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचे माहित असूनही गप्प बसलेले आरोपी अजूनही अंधारातच आहेत. 

वर्धेतील आरोपी स्वीच्ड आॅफ 

या प्रकरणात महत्वाची भूमीका वठविणारे वर्धा येथील आरोपी डॉक्टर आणि व्यापारी फरार आहे. त्यांनी आपले मोबाईल स्वीच्ड आॅफ केल्याने त्यांना हुडकणे पोलिसांसाठी कठीण काम ठरले आहे. ते हाती लागल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उजेडात येऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे.