शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Nagpur: सलग १४ तासांच्या शस्त्रक्रियेने तरुणाचा वाचविला पाय

By सुमेध वाघमार | Updated: January 5, 2024 19:43 IST

Nagpur Health News: एका अपघातात तरुणाच्या मांडीचे सर्वांत मजबूत हाडच चक्काचूर झाले. शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपुरात यावे लागले. यात उपचारासाठी महत्त्वाचा असलेला १२ तासांचा वेळ गेला. परिणामी, पाय निळा पडला. डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन उसंत न घेता सलग १४ तास शस्त्रक्रिया केली.

- सुमेध वाघमारे नागपूर  - एका अपघातात तरुणाच्या मांडीचे सर्वांत मजबूत हाडच चक्काचूर झाले. शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपुरात यावे लागले. यात उपचारासाठी महत्त्वाचा असलेला १२ तासांचा वेळ गेला. परिणामी, पाय निळा पडला. डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन उसंत न घेता सलग १४ तास शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी त्या तरुणाचा पायच वाचविला नाही, तर त्याचे उर्वरित आयुष्य दिव्यांग होण्यापासूनही वाचविले.

मध्य प्रदेशातील सिवनी येथील १९ वर्षीय आकाश (बदललेले नाव) असे त्या रुग्णाचे नाव. मागील महिन्यात एका वाहनाने आकाशला जोरदार धडक दिली. या धडकेने त्याच्या मांडीच्या सर्वांत मजबूत हाडाचा ''फेमर शाफ्ट'' चक्काचूर झाला. स्थानिक डॉक्टरांनी उपचार केल्यावर त्याला नागपुरात जाण्यास सांगितले. सिवनीहून नागपुरात येण्यास १२ तासांचा वेळ गेला, जो उपचारासाठी ''गोल्डन अवर'' होता. नातेवाइकांनी गांधीबाग येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक वरिष्ठ क्रिटिकल केअर विशेषज्ञ डॉ. आर. जी. चांडक यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक तपासण्या करीत त्याला थेट शस्त्रक्रियागृहात घेतले आणि तब्बल १४ तासांच्या सलग शस्त्रक्रियेने त्याचा पाय वाचविला.

एम्बोलेक्टोमी नावाच्या प्रक्रियेने वाचविला पायविषबाधा झालेल्या एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी डॉ. चांडक यांनी ७ तासांत १९ हजार ३२० इंजेक्शन दिले. ह्यलिम्का बुक आॅफ रेकॉर्डह्णमध्ये याची नोंद आहे. आता १४ तासांच्या सलग शस्त्रक्रियेतून त्यांच्यासमोर रुग्णाचा पाय वाचविण्याचे ध्येय होते. डॉ. चांडक म्हणाले की, ह्यएम्बोलेक्टोमीह्ण नावाच्या प्रक्रियेद्वारे पायातील बधिर झालेल्या रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीत केला. आॅर्थाेपेडिक शस्त्रक्रियेने परिश्रमपूर्वक हाडांचे तुकडे पुन्हा जोडून एक स्थिर रचना तयार केली. या शस्त्रक्रियेमध्ये ह्यसेप्सिसह्णचे मोठे आव्हान होते. परंतु, ह्यइंटेन्सिव्हिस्टह्ण प्रमुख डॉ. किरण पटेल, आॅर्थाेपेडिक सर्जन डॉ. अभिनव जोगानी, व्हस्क्युलर सर्जन डॉ. तेजस आणि अ‍ॅस्थॅटिक सर्जन डॉ. रणजित यांचे अनुभव व कौशल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

अपंगत्व टाळता आले याचा आनंदह्यगोल्डन अवरह्णमध्ये आकाशला उपचार मिळाले असते तर पाय निळा पडेपर्यंत म्हणजे कापण्यापर्यंत वेळ आली नसती. महत्त्वाच्या उपचारात उशीर झाला असला, तरी डॉक्टरांच्या चमूंच्या अथक परिश्रमामुळे त्याचा पाय वाचविणे शक्य झाले. त्याचे अपंगत्व टाळता आले याचा आनंद आहे.- डॉ. आर. जी. चांडक, वरिष्ठ क्रिटिकल केअर

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरnagpurनागपूर