शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

नागपुरात एप्रिलमध्ये ६७२ वेळा बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:42 AM

शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत.

ठळक मुद्देमहिनाभरात सतत ब्रेकडाऊननागरिकांना बसताहेत तापमानाचे चटके

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तापमानाचे चटके सहन करावे लागत आहेत. ही समस्या विशेषत: एसएनडीएलच्या क्षेत्रात पहायला मिळत आहे. महावितरणच्या अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे.अहवालानुसार एप्रिलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ३३ केव्ही लाईनचे एकूण ६७२ वेळा म्हणजे, रोज २२.४ वेळा ब्रेकडाऊन झाले. त्यावरून दर तासाला कुठे ना कुठे वीजपुरवठा बंद होत असल्याचे सिद्ध होते कारण, ११ केव्ही व अन्य किरकोळ बिघाडामुळे वीज पुरवठा बंद होण्याच्या आकडेवारीचा यात समावेश नाही. महावितरण ३३ केव्ही लाईनमध्ये झालेल्या ब्रेकडाऊनचा अहवाल दर महिन्यात मुख्यालयाला सादर करते. त्या अहवालामध्ये एसएनडीएल क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या बिघाडाचा समावेश असतो. एसएनडीएल क्षेत्रात अनेक ब्रेकडाऊन झाले आहेत. महावितरण अधिकारी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असल्यामुळे ब्रेकडाऊन होत असल्याचा दावा करीत आहेत. उन्हाळ्यात वीज उपकरणे लवकर तापतात. ती थंड रहावी याकरिता कुलर लावण्यात आले आहेत. परंतु, बहुतांश उपकरणे मोकळ्या जागेवर असल्याने त्यांना थंड ठेवणे शक्य होत नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.एसएनडीएलनुसार तापमानासह वीज पुरवठ्यावरचा दबावही वाढला आहे. गेल्यावर्षी २५ मे रोजी ४११ एमव्हीए विजेच्या मागणीची नोंद झाली होती. यावर्षी या महिन्याच्या दुसºया आठवड्यातच विजेची मागणी ३७५ एमव्हीएपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मागणी लवकरच ४११ एमव्हीएचा उच्चांक ओलांडण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्यामुळे तांत्रिक बिघाड होत आहेत.खोदकामही कारणीभूतवीज कंपन्यांच्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग, ओसीडब्ल्यू, मेट्रो आदी संस्था विविध कामांसाठी खोदकाम करीत आहेत. दरम्यान, अनेकदा वीज केबलचे नुकसान होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होतो. केबल जोडल्यानंतर तो भाग अधिक दबाव सहन करू शकत नाही. जोड उघडा पडून ब्रेकडाऊन होतो.दिलासा नाही, आराखडा मात्र तयारवीजपुरवठा बंद होण्यापासून दिलासा मिळण्याची काहीच आशा नाही. एसएनडीएलमधील सूत्रानुसार, शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज लाईनमध्ये शिरल्या आहेत. केवळ बुधवारी वीजपुरवठा बंद करून त्या फांद्या तोडणे अशक्य आहे. त्यामुळे रोज सकाळी वीजपुरवठा बंद करून फांद्या तोडण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी ४५ दिवसात ९३ वर ब्रेकडाऊन झाल्याचे स्वीकारले आहे. तसेच, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडा तयार असल्याचा दावा केला आहे. विकासकामे करताना केबल तोडण्यात आल्यामुळे २५ वर ब्रेकडाऊन झाल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.सकाळी मेडिकल, सायंकाळी महालचे हालमेडिकल फिडर अंतर्गतच्या परिसरात शुक्रवारी बरेच तास वीज बंद होती. एसएनडीएलच्या माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरातील झाडे कापण्यासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तसेच, दाब दुसºया फिडरवर स्थानांतरित केल्यामुळे वीजपुरवठा प्रभावित झाला. सायंकाळी महाल परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद पडला. याशिवाय मनीषनगर येथील बाळकृष्ण कंदिले यांच्या घरचा वीजपुरवठा रात्री बंद होता. वारंवार तक्रार करूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही.

टॅग्स :electricityवीज