- सुमेध वाघमारे नागपूर - ‘एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’चे (एएमएल) म्हणजे तीव्र स्वरुपातील रक्ताचा कर्करोगाचे नदान झालेल्या एका ५६ वर्षीय महिलेवर केवळ २१ दिवसांच्या थेरपीने रुग्णाला आराम मिळाला, तिच्या वाढत्या वयाचा विचार करता, ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कमी होत असलेले प्लेटलेटची संख्या, घसरत असलेली हिमोग्लोबिनची पातळी आणि सतत ताप आदी चिंताजनक लक्षणांनी ५६ वर्षीय महिला ग्रस्त होती. काही कॉपरेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही आजार बरा होत नव्हता. अखेर कुटुंबियांनी रुग्णाला वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी इन्स्टिट्यूट येथे दाखल केले. आॅन्कोलॉजिस्ट डॉ. स्मिता गुप्ते यांनी रुग्णाचा अभ्यास करून काही तपासण्या करून घेतल्या. त्यांना ‘एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’ (एएमएल) आजाराचे निदान झाले.
एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’मध्ये कर्करोगाच्या पेशी वेगाने पसरतात‘लोकमत’शी बोलताना डॉ. स्मिता गुप्ते म्हणाल्या, ल्युकेमिया हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो अस्थिमज्जा सारख्या रक्ताच्या ऊतींपासून विकसित होतो. ल्युकेमियामध्ये, पांढºया रक्त पेशींवर परिणाम होतो आणि अस्थिमज्जा असामान्य पेशी निर्माण करण्यास सुरवात करते. या असामान्य पेशींना कर्करोगाच्या पेशी म्हणतात. जे निरोगी पेशींना घेरतात आणि त्यांना कार्य करू देत नाहीत. ‘एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’मध्ये ‘मायलॉइड’ पेशी प्रभावित होतात. जे पांढºया रक्तपेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेटमध्ये विकसित होतात. या प्रकारात देखील कर्करोगाच्या पेशी फार वेगाने पसरतात. हे प्रौढांना अधिक प्रभावित करतात.
डॉक्टरांचा अनुभव व रुग्णाचा दृढ निश्चयडॉक्टरांचा अनुभव व रुग्णाचा दृढ निश्चयाचा बळावर केवळ २१ दिवसांच्या थेरपीमध्ये रुग्णाला आराम मिळाला. तिच्या वाढत्या वयाचा विचार करता ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे डॉ. गुप्ते म्हणाल्या. ही थेरपी डॉ. गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली डॉ. नेहा अग्रवाल (क्रिटिकल केअर इनचार्ज ), डॉ. हेमंत देशपांडे (सिनिअर इंटेन्सिव्हिस्ट), डॉ. राकेश भैसारे (इंटेन्सिव्हिस्ट), नर्सेस आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीने यशस्वी झाली.