शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपुरात ४१८० विद्यार्थ्यांचा मनपा शाळेला टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:54 IST

खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद पडत असल्याने भविष्यात शिक्षकांच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आता शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्दे५ वर्षात ३५ शाळा पडल्या बंद; कधी होणार सुधारणा ?नोकरी वाचवायची, तर विद्यार्थी शोधा!शिक्षकांवर आता पटसंख्येची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खालावलेला शिक्षणाचा दर्जा व पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल यामुळे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. गेल्या पाच वर्षात ४१८० पटसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या तब्बल ३५ शाळा बंद पडल्या आहेत. शाळा बंद पडत असल्याने भविष्यात शिक्षकांच्या नोकरीवर संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नोकरी वाचवण्यासाठी आता शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. यासाठी नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.महापालिकेच्या काही शाळांचा अपवाद वगळता बहुसंख्य शाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. मागील काही वर्षात पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला आहे. सुविधांचा अभाव व प्रशासनाची उदासीन भूमिका यामुळे शिक्षण विभागात मरगळ आली आहे. २०१३-१४ या वर्षात महापालिकेच्या ७४ मराठी प्राथमिक शाळा होत्या. आता ही संख्या ४९ पर्यंत खाली आली आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पटसंख्या आणखी क मी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे.मोलमजुरी करणाऱ्या पालकांनाही आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घ्यावे असे वाटते. गेल्या दोन वर्षात महापालिकेच्या शाळेतही इंग्रजी शिक्षण सुरू झाले आहे. पण खासगी शाळांच्या तुलनेत प्रतिसाद कमी आहे. याचा विचार करता शिक्षकांना प्रशिक्षित करून, प्रभागा-प्रभागात कार्यक्रमांचे आयोजन करून पालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. विद्यार्थी मिळावे म्हणून शिक्षकांना सध्या घरोघरी विद्यार्थी शोधत फिरावे लागणार आहे.नगसेवकांची मदत घेणार४नगरसेवकांचा परिसरात चांगला संपर्क असल्याने विद्यार्थी शोधण्याच्या या मोहिमेत नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. याबाबतच्या सूचना त्यांना करण्यात येतील. पुढील सत्रासाठी पहिल्या वर्गात सहा हजार विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी झाली आहे, अशी माहिती शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.दर्जा उंचावण्याचा प्रयत्न४महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी शिक्षण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण, शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ३६ शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक उपक्र म हाती घेण्यात आले आहे.विद्यार्थ्यांची घटलेली पटसंख्यावर्ष                 विद्यार्थी२०१४-१५       १५४१२०१५-१६       ९५०२०१६-१७       १०९७२०१७-१८       ५९२एकूण             ४१८० 

टॅग्स :SchoolशाळाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका