शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

नागपुरात मिरची १०० तर कोथिंबीर १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:04 IST

खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत.

ठळक मुद्देदोन महिने भाज्या महाग मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत. सामान्यांसाठी वांगे, पत्ताकोबी, कोहळे, पालक, लवकी परवडणाऱ्या किमतीत आहे. पेरणीनंतर शेतकरी भाज्यांची लागवड करतील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास भाव कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.स्थानिक शेतकऱ्यांकडून केवळ १० टक्के भाज्यांची आवक सुरू आहे. बहुतांश भाज्या नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यातून येत असल्यामुळे सध्या भाज्या महाग आहेत. पत्ताकोबी वर्षभर मुलताई येथून विक्रीला येते. टोमॅटो संगमनेर, नाशिक या भागातून तर तोंडले, भिलई, रायपूर, दुर्ग येथून आणि गेल्या सात ते आठ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातून कोहळे आणि हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात नागपूर बाजारपेठेत येत आहे.परतवाडा येथून बारीक हिरव्या मिरचीची आवक आहे. तसे पाहिल्यास एक महिन्यापासून भाज्यांच्या किमती स्थिर आहेत. कॉटन मार्केटमध्ये दररोज लहानमोठ्या ६० ते ७० गाड्या आणि कळमन्यात १२० ट्रकची आवक आहे. पण किरकोळमध्ये दुप्पट आणि तिपटीच्या भावात विक्री होत असल्यामुळे गृहिणींना भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात, अशी माहिती कॉटन मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.

फूलकोबी ४० रुपयांवरकॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाज्यांची आवक चांगली असतानाही किरकोळमध्ये गृहिणींना भाज्या दुप्पट भावातच खरेदी कराव्या लागतात. काही भाज्यांमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. कॉटन मार्केटमध्ये फूल कोबी २५ रुपये आणि हिरव्या मिरचीचे भाव ५० रुपये आहेत. पण किरकोळमध्ये फूलकोबी प्रति किलो ५० रुपये आणि हिरवी मिरची ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागते. दुपटीच्या आकडेवारीनुसार किरकोळमध्ये वांगे प्रति किलो १५ रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, कोहळे ३०, लवकी २०, भेंडी ५०, कारले ७०, तोंडले ४० ते ५० रु., सिमला मिरची ८०, चवळी शेंग ३५, गवार ४०, बीन्स ८०, परवल ६०, ढेमस ६०, पालक २५, चवळी भाजी ४०, मेथी ८० रु., काकडी ४०, मुळा ४०, गाजर ४०, फणस ६० आणि कैरीचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये आहेत.टोमॅटोही आले ४० वरपावसामुळे कोथिंबीर खराब झाल्यामुळे भाव अचानक वाढले. स्थानिकांकडून आवक नगण्य आहे. सध्या कोथिंबीर नांदेड, छिंदवाडा, उमरानाला आणि रामकोना येथून विक्रीस येत आहे. आवक कमी असल्यामुळे कॉटन मार्केटमध्ये दर्जानुसार ७० ते ८० रुपये किलो विक्री सुरू आहे. किरकोळमध्ये १२० ते १३० रुपयांपर्यंत गृहिणींना खरेदी करावी लागत आहे. महिन्यापासून कमी असलेले टोमॅटोचे भाव किरकोळमध्ये ४० रुपयांपर्यंत वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद आहे. पण सध्या नाशिक, संगमनेर या भागातून नागपुरात वर्षभर टोमॅटो विक्रीस येतात.

टॅग्स :vegetableभाज्या