नागपुरात नागपंचमीनिमित्त मंदिरांमध्ये झाले पुजन व अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:35 IST2019-08-05T22:30:56+5:302019-08-05T22:35:46+5:30
श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आणलेल्या पाण्यानी भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिर व महालातील पाताळेश्वर मंदिरासोबतच दहन घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महालातील चिटणीसपार्क येथील नागोबा मंदिरात सकाळी भाविकांची गर्दी झाली होती.

नागपुरात नागपंचमीनिमित्त मंदिरांमध्ये झाले पुजन व अभिषेक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आणलेल्या पाण्यानी भगवान शिवाचा अभिषेक करण्यात आला. तेलंगखेडीच्या कल्याणेश्वर मंदिर व महालातील पाताळेश्वर मंदिरासोबतच दहन घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. महालातील चिटणीसपार्क येथील नागोबा मंदिरात सकाळी भाविकांची गर्दी झाली होती.
नागमंदिर जरीपटका
जरीपटका येथील संत चांदूराम दरबार मार्गावरील नागमंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. अशोक हेमराजानी व राजू सावलानी यांनी नागदेवतेचे पूजन केले. फुलांची सेज सजविण्यात आली होती. अखंड ज्योत पेटविण्यात आली होती. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. काजू हरचंदानी, भूषण हरचंदानी, राजू सावलानी, ठाकुर जग्यासी, सुरेश जग्यासी, दिलीप सावलानी, अशोक सावलानी, राम सावलानी, दीपक सावलानी आदींचे सहकार्य लाभले.
बजेरियामध्ये नागपंचमीनिमित्त मेळा
बजेरियामध्ये अनेक वर्षापासून नागपंचमीनिमित्त मेळा भरतो. मोठ्या संख्येने भाविक या मेळाव्यात सहभागी होता. नागपूर शहर पोलीस मित्र समितीतर्फे आयोजित या मेळ्याचे उद्घाटन नगरसेवक जयप्रकाश गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर भगवान शिव व नागदेवतेचेही पूजन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, महेश चव्हाण, सुनील गांगुर्डे, दीपक पटेल, जुल्फेकार अहमद भुट्टो, महेश श्रीवास, संजय बालपांडे, एस. एस. गडेकर आदी उपस्थित होते. त्याचबरोबर समितीचे ममता वाजपेयी, शिवपाल शर्मा, हरीश कुंडले, शंकर जयपूरकर, कृष्णा गौर, किशोर तिवारी, शैलेंद्र साहू, नर्मदा राजोरिया, मीना बसाक, बबलू मिश्रा आदी उपस्थित होते.
शिवशक्ती मंदिर
जरीपटका येथील जनता हॉस्पिटलजवळ शिवशक्ती मंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. संजय गोधानी यांच्या उपस्थितीत सकाळी महादेव नागदेवतांचे पूजन करण्यात आले. पं. सुनील शर्मा व मुरली महाराज यांच्या उपस्थितीत पूजा झाली. महाआरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. सुरेश जग्यासी, सुरेश गोधानी, सोनी जानयानी, भागचंद जारानी, चिराग गोदानी, दिवान कुकरेजा, अनिल कुकरेजा, निखिल केसवानी, राजेश कुकरेजा आदी उपस्थित होते.
राजराजेश्वरी शिवनाग मंदिर
शांतिनगर कॉलनी येथील राजराजेश्वरी शिवनाग मंदिरात नागपंचमी साजरी करण्यात आली. नागदेवतेचे पूजन व अभिषेक करण्यात आला. पूजा पं. अरुण झा यांच्याद्वारे करण्यात आली. महाआरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी निरंजन शेंडे, रघुनाथ शेंडे, गणेश कांबळे, रमेश वर्मा, रमेश कांबळे, सुनील शर्मा, हरी जनवारे, अनिल चुटेलकर, चैतन्य शेंडे, निखिल शेंडे, सुजीत झा आदी उपस्थित होते.