शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Nagar Panchayat Election Results 2022 : हिंगणा नगर पंचायतीत भाजपची सत्ता, कुहीत कॉंग्रेसची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 4:11 PM

जिल्ह्यात हिंगणा आणि कुही या दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. यात हिंगण्यात भाजपने विजय मिळवला असून कुहीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देहिंगण्यात राष्ट्रवादीचे बंग यांना धक्का तर भाजपाचे आ.मेघे यांचे वर्चस्व कायम कुहीत कॉंग्रेसच्या राजू पारवेंनी बाजी मारली; राष्ट्रवादीचाही ४ जागावर विजय 

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत भाजपाने दमदार विजय मिळविला आहे. कुही नगरपंचायतीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळविता आली नसली तरी अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.

बुधवारी हिंगणा आणि कुही नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तीत १७ सदस्यीय हिंगणा नगरपंचायतीत भाजपाला ९, राष्ट्रवादी-५, शिवसेना-१ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. 

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला ११ तर भाजपाला ६ जागावर यश मिळाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग यांना धक्का देत आ.समीर मेघे यांनी बाजी मारली. येथे भाजपाच्या तीन जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या ६ जागा कमी झाल्या आहेत. 

हिंगण्यात पश्चिम नागपूरचे आ.विकास ठाकरे, जि.प.सदस्या कुंदा राऊत, बाबा आष्टणकर यांच्या बळावर कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र तो यशस्वी हो‌वू शकला नाही. हिंगण्यात कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. कुही नगरपंचायतीच्या १७ पैकी ८ जागावर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या तर एका वॉर्डात अपक्ष उमेदवार विजय झाला. येथे अपक्ष उमेदवाराच्या बळावर कॉंग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचा दोन वॉर्डात निसटता पराभव झाला अन्यथा कुहीत सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीकडे निश्चितच गेल्या असत्या. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे हा फटका बसला. 

कुहीत गतवेळी कॉंग्रेसचा ८, भाजपा-५, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे प्रत्येक एक नगरसेवक विजयी झाले होते. यावेळी कुही कॉंग्रेसचा ग्राफ वाढला नसला तरी त्यांनी गतवेळच्या जागा कायम राखल्या आहे. आ.राजू पारवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीचा गड उमरेड विधानसभा क्षेत्राचे प्रभारी विलास झोडापे यांनी लढविला. यात राष्ट्रवादीला गतवेळपेक्षा तीन जागा अधिक जिंकता आल्या. 

अंतिम निवडणूक निकाल असे 

हिंगणा नगरपंचायतएकूण जागा - १७भाजपा - ९राष्ट्रवादी कॉंग्रेस- ५कॉंग्रेस- ००शिवसेना - १अपक्ष - २

कुही नगरपंचायत एकूण जागा - १७कॉंग्रेस - ८राष्ट्रवादी- ४भाजपा - ४शिवसेना - ००अपक्ष- १

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२