शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विनयभंग करणाऱ्याला जमावाने रस्त्यावरच बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:59 IST

भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देतरुणीशी लज्जास्पद वर्तन : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरदुपारी रस्त्यावर तरुणीची छेड काढू पाहणाऱ्या मजनूला संतप्त जमावाने बदडून काढले. वेळीच पोलीस पोहचले म्हणून त्याचा जीव वाचला. जमावाच्या हातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अजय जयसिंग सिखरवार (वय २३) असे मजनूगिरी करणाऱ्याचे नाव आहे. तो पांढराबोेडीतील रहिवासी आहे.पीडित तरुणी २० वर्षांची आहे. ती बुधवारी दुपारी ३.२० वाजता लाहोरी बार समोरच्या आॅप्टीकल दुकानासमोरून जात असताना आरोपी अजय सिखरवार हा तिच्या मागे गेला अन् भररस्त्यावर तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तरुणीने त्याचा विरोध करून आरडाओरड केली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. तरुणीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त जमावाने आरोपी सिखरवारला बदडून काढले. एकाने नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. त्यावेळी सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या सहकाऱ्यांसह याच भागात गस्त घालत होते. त्यामुळे काही वेळेतच ते तेथे पोहचले. आरोपीला जमाव बदडत होता. त्यांनी जमावाची कशीबशी समजूत काढून त्यांच्या तावडीतून आरोपी सिखरवारला ताब्यात घेतले. जमावाने आरोपीला बुकलल्याने तो जबर जखमी झाला होता. तो दारूच्या नशेत टून्न होता. त्याच्यावर उपचार करून घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेत आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrimeगुन्हा