शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नागनदीला सुरक्षा भिंत नसल्याने धोका, निकृष्ट सिमेंट रोड उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लकडगंजमधील हिवरीनगर, पँथरनगर, शास्त्रीनगर परिसरातून वाहणाऱ्या नागनदीची सुरक्षा भिंत मागील काही वर्षापासून कोसळलेली आहे. ...

ठळक मुद्देमहापौर आपल्या दारी : लकडगंज झोनमधील झोपडपट्टीधारकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंजमधील हिवरीनगर, पँथरनगर, शास्त्रीनगर परिसरातून वाहणाऱ्या नागनदीची सुरक्षा भिंत मागील काही वर्षापासून कोसळलेली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने तातडीने दुरुस्त करण्यात यावी. तीन वर्षापूर्वी जयभीम चौक ते कुंभारटोली हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. परंतु निकृष्ट कामामुळे हा रस्ता उखडला आहे. यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. गडर लाईनची समस्या, कचऱ्याची समस्या असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे केली.          शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक ४ व २३ मधील नागरिकांशी भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी नागनदीला संरक्षण भिंत तातडीने उभारण्याची मागणी केली. तसेच गडर लाईन व झोपडपट्टीधारकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. आरोग्य सभापती मनोज चापले, नगरसेविक निरंजना पाटील, मनिषा अतकरे, मनिषा धावडे, राजकुमार साहू, शेषराव गोतमारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, सुभाष जयदेव प्रामुख्याने उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी कळमना येथील नवनिर्मित जलकुंभ परिसाराला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्याठिकाणी पाण्याचा समस्या मोठ्या प्रमाणावर होत्या. सहा महिन्याच्या आत पाण्याच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन नंदा जिचकार यांनी दिले. कचरा गाडी नियमित येत नाही, अशी तक्रार केली असता संबंधित स्वास्थ निरिक्षकाला जाब विचारत कचऱ्याची समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देंश दिले. विजयनगर परिसरात मोकळ्या भूखंडावर पाणी साचून राहते, याबाबत तक्रार होती. गडरलाईन चोकअप झाल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी, असे निर्देश महापौरांनी दिले.कळमना परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातून कचरा जाळल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याची तक्रार नगरसेवक राजकुमार साहू यांनी केली. त्यावर बोलताना जिचकार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला याबाबत पत्र देण्यात यावे, यानंतरही समस्या न झाल्यास नोटीस बजावण्यात याव्यात, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.स्मशान घाटावर सुविधांचा अभावभरतवाडा व पुनापूर येथील दहनघाटावार कोणत्याही स्वरुपाच्या सुविधा नाही. त्या ठिकाणी सौंदर्यीकरण व नूतनीकरण गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. महापौरांनी याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश झोनच्या अधिकाऱ्यांना दिेले .शास्त्रीनगर ते बाभूळगाव या रस्त्याची पाहणी केली. गरोबा मैदानाच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना नोटीसनंदा जिचकार यांनी झोनमधील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. झोन कार्यालयातील समाजकल्याण विभागात अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. याचवेळी त्यांनी मालमत्ता व पाणी कर वसुलीसंदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. करवसुलीचा वेग वाढवा आणि १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

 

टॅग्स :MayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका