नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला आयएसओ दर्जा प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:50+5:302021-04-04T04:08:50+5:30
नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला आयएसओ ९००१:२०१५ कंपनीचा दर्जा मिळाला आहे. आयएसओ प्रमाणपत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला आयएसओ दर्जा प्राप्त
नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला आयएसओ ९००१:२०१५ कंपनीचा दर्जा मिळाला आहे. आयएसओ प्रमाणपत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि माजी अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी स्वीकारले.
अश्विन मेहाडिया म्हणाले, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सात दशकापासून व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. चेंबर सरकारी आणि गैरसरकारी संस्थांशी संपर्क साधून व्यापाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी काम करीत आहे. चेंबर गेल्या अनेक वर्षांपासून भारतात निर्मित होणाऱ्या स्थानिक वस्तूंच्या निर्यातीसाठी सरकारतर्फे आवश्यक ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ निर्यातदारांना उपलब्ध करते. याकरिता चेंबरला आता आयएसओ ९००१:२०१५ नोंदणीकृत कंपनीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
चेंबरचे माजी अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, विदर्भातील व्यापाऱ्यांसाठी चेंबरचे कार्य अतुलनीय राहिले आहे. विदर्भातील निर्यातदारांच्या सुविधेसाठी ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ उपलब्ध करून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहे. आयएसओ प्रमाणपत्रामुळे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची विश्वसनीयता आणखी वाढली आहे.