शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नाग नदी प्रकल्प : गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला राज्य शासनाची वित्त हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 9:05 PM

नागपूर शहराच्या मधून जाणारी नाग नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक हिश्श्याला हमी देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या मधून जाणारी नाग नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक हिश्श्याला हमी देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाने घेतला. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.या प्रकल्पाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी समन्वय समिती नियुक्त करण्यात येणार आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे या समितीचे अध्यक्ष असतील. नाग नदीपासून होणारे प्रदूषण रोखण्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गतच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने नाग नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २,४१२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिका करणार आहे. नदीत येणारे सांडपाणी अडविणे/वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बांधणे, सुलभ शौचालये अशी कामे या प्रकल्पात करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठीचा ६० टक्के (१४४७.५९ कोटी रु.) खर्च केंद्र सरकार, २५ टक्के (६०३.१६ कोटी रु.) खर्च राज्य शासन तर १५ टक्के (३६१.८९ कोटी रु.) खर्चाचा भार नागपूर महापालिका उचलेल. या प्रकल्पासाठी जायका संस्थेकडूनच १८६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे.मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्य शासनाच्या हिश्श्याच्या ६०३.१६ कोटी रुपये इतक्या हिश्श्यापैकी ४०३.९ कोटी रुपये हे केंद्र सरकार जायका या वित्तीय संस्थेकडून घेणार आहे. या कर्जाची परतफेड (एकूण कर्जाच्या २१.७७ टक्के) तसेच राज्य शासनाच्या हिश्श्यातील उर्वरित १९९.२६ कोटी रु. इतकी अतिरिक्त रकमेची हमीदेखील केंद्रीय जलशक्ती मंत्रालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी समन्वय समितीया प्रकल्पाच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सदस्य तर महापालिका आयुक्त सदस्य सचिव असतील.

 

टॅग्स :Naag Riverनाग नदीState Governmentराज्य सरकार