शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात   ९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:54 IST

आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.

ठळक मुद्दे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनचा प्रवास २० मिनिटात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या रिच-१ मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली असली तरी नागरिकांच्या सोयी सवलती आणि सुरक्षेच्या अनुषंगाने कार्य चालू आहेत. आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.११.५ कि.मी लांबीच्या या मार्गावर आरडीएसओचे निरीक्षण घेण्यात आले. ९७० प्रवाशांच्या वजनाइतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती रेल्वेत भरली होती. रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्या उपस्थितीत परीक्षण घेण्यात आले. गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमर्यादा आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. आरडीएसओच्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली.सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग वाढविण्यात आला. त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली. परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. आरडीएसओ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते. या सर्व मानकांतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून आरडीएसओतर्फे करण्यात आल्या. यानंतर याचा सविस्तर अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर