शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

अबब...नागपुरात जागोजागी अवतरल्या गोगलगायी; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:46 IST

दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे.

ठळक मुद्देकाही विषारी असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच कोरोनाच्या धास्तीने नागरिकांना हैराण केले असताना दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे. घरात, विहिरीत, भिंतीवर, छपरावर चालणाऱ्या या गोगलगाईं अंगणात अक्षरश: खच पडलेला असतो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाई दिसत असल्याने लोकांमध्ये वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

बेसा रोड, मानेवाडा भागातील गीतानगर, गजानननगर, शाहूनगर, कपिलनगर आदी वस्त्यांमधील नागरिकांना येत आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराच दरवाजा उघडला की अंगणात या शंख असलेल्या गोगलगाईंचा सडा पडलेला असतो. घरातील महिला, मुले यांना भीती वाटत असल्याने हात लावायला तयार नसतात. त्यामुळे घरच्या पुरुषांना सकाळी उठल्यावर आधी यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. एकएक घरातून ३०० ते ५०० गोगलगाई टोपलीने किंवा बोºयात भरून काढाव्या लागतात.

वस्तीमध्ये रिकाम्या भूखंडांवरील पाण्यात, कचºयात अगदी लाखोंच्या संख्येने त्या पसरलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव अधिक आहे. विहिरीच्या पाण्यात, कचºयात, गवतात त्या दिसतात. त्यामुळे पाण्यातून घाण व कुजकट दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. परिसरातील नागरिक पांडुरंग ठाणेकर यांनी सांगितले, याबाबत महापालिक, आरोग्य विभाग व प्रभागाच्या नगरसेवकांना माहिती दिली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की गोगलगाय दिसते पण त्यांचे प्रमाण नगण्य असते. मात्र यावर्षी त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक दहशतीत जगत असताना यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाय का निघाल्या, या विचाराने लोकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाली आहे.- ३०-४० वर्षापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती, जंगलाचा परिसर होता. त्यामुळे कदाचित गोगलगाई आल्या असाव्यात, अशी शंका आहे. मात्र यापूर्वी त्या मोठ्या संख्येने कधी दिसल्या नाही आणि यावर्षी असे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात दिसतात पण शहरात पहिल्यांदा मोठ्या संख्येने त्या दिसत असल्याचे बोलले जात आहे.- मीठ टाकून मारण्याचा प्रयत्नया गोगलगाईंमुळे नागरिकांना शारीरिक किंवा आजाराबाबतची कुठलीही समस्या आली नसली तरी अनामिक भीती, अस्वस्थपणा व विचित्रपणा नक्कीच अनुभवावा लागतो आहे. तक्रारीनंतरही मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी स्वत:च ब्लिचिंग पावडर किंवा फिनाईल टाकून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फायदा होत नसल्याने गोगलगाईंवर मीठ टाकून मारले जात आहे.- काही विषारीही असतातगोगलगाईबाबत माहिती जाणून घेतली असता, त्या ३५ हजार प्रकारच्या असल्याची माहिती मिळाली. हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. विशिष्ट खूण ठेवण्यासाठी चिकट पदार्थ स्रवत असतात. त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात. शंख असलेल्या गोगलगाईंमध्येच विषारी प्रकार आढळून येतो. त्यामुळे या विषारीही असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे विषारी प्रकार आढळून येत नाही.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव