संगीतकार रवींद्र जैन यांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: October 7, 2015 03:22 IST2015-10-07T03:22:53+5:302015-10-07T03:22:53+5:30
ज्येष्ठ संगीतकार व गायक रवींद्र जैन यांची रविवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना प्लाटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

संगीतकार रवींद्र जैन यांची प्रकृती गंभीर
नागपूर : ज्येष्ठ संगीतकार व गायक रवींद्र जैन यांची रविवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना प्लाटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु मंगळवारी प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या मते मूत्रपिंडातील इन्फेक्शन पसरून महत्त्वाचे अवयव निकामी झाले आहेत. सध्या त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असून पुढील उपचारासाठी विमानाने मुंबईत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रवींद्र जैन एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी नागपुरात आले. सायंकाळपासून त्याना बरे वाटत नव्हते. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. दुपारी १२ वाजता त्यांना तातडीने प्लाटिना रुग्णालयात हलविण्यात आले होते. सोमवारी त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. परंतु प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. येथील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. अजय साखरे यांनी सांगितले, जैन यांनी प्रकृती गंभीर आहे. मूत्रपिंडातील जंतू संसर्गामुळे, रक्तदाब कमी होऊन महत्त्वाचे अवयव निकामी झाले आहेत. अतिदक्षता विभागात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)