शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुत्तेमवार, ठाकरे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:52 IST

शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष्ट गट पुढे सरसावला आहे. शनिवारी बैठकीत  माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव पारित करून राहुल गांधी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देअसंतुष्ट गटाची मागणी : राहुल गांधी यांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष्ट गट पुढे सरसावला आहे. शनिवारी बैठकीत  माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव पारित करून राहुल गांधी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काँग्रेसमधील असंतुष्ट गटाची नगरसेवक किशोर जिचकार यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यशवंत कुंभलकर होते. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शहर महासचिव विजय बाभरे, किशोर जिचकार, हनीफ सिद्दीकी, बाबा वकील, मोहम्मद कलाम, संजय दुबे, राजेश जरगर, नीरज चौबे, दीपक कापसे आदी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीला वर्ष झाल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना द्वेषभावनेतून शहर काँग्रेसतर्फे नोटीस बजावण्यात आली. हा प्रकार निंदनीय आहे. माजी खासदार गेव्ह आवारी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न शहर काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला तसेच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर वारंवार आरोप केले जात आहेत. त्यामुळे नागपूर शहरात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवावयाचे असेल तर विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांना पक्षातून बाहेर काढावे लागेल. काँग्रेसमध्ये राहून दोघेही भाजपाला बळकट करीत आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर