लुटारुंनी केला वृद्धेचा खून

By Admin | Updated: July 14, 2014 02:51 IST2014-07-14T02:51:07+5:302014-07-14T02:51:07+5:30

बुरख्यात साळसूदपणे घरात घुसलेल्या दोन सशस्त्र लुटारुंनी

The murderer murdered the elderly | लुटारुंनी केला वृद्धेचा खून

लुटारुंनी केला वृद्धेचा खून

नरेंद्रनगर भागात दिवसाढवळ्या थरार
नागपूर :
बुरख्यात साळसूदपणे घरात घुसलेल्या दोन सशस्त्र लुटारुंनी एका ६२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी दिवसाढवळ्या १ वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर भागातील दीनप्रजाहित सोसायटी येथे घडली.
रोशनी मीरादास पेटकर, असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी रोशनी पेटकर आंघोळीला गेल्या होत्या. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा मुलगा स्वप्निल हा मनसरच्या मॅगनीज माईन्समध्ये नोकरी करीत असल्याने तो सकाळी कामावर निघून गेला होता. सून दीपिका (२९) ही आपल्या चार महिन्याचा चिमुकला हिमांशूला घेऊन छतावर कपडे वाळवत होती. अचानक ३०-३५ वयोगटातील तोंडाला फडके बांधून असलेले दोन लुटारू हातात चाकू घेऊन घरात घुसले.

Web Title: The murderer murdered the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.